भेंडी केंद्राला २४ तास वीजपुरवठा

By Admin | Updated: January 30, 2016 23:21 IST2016-01-30T22:40:06+5:302016-01-30T23:21:15+5:30

कळवण : पणन मंडळाचे व्यवस्थापक मिलिंद आकरे यांची माहिती

24-hour electricity supply to Vhendi center | भेंडी केंद्राला २४ तास वीजपुरवठा

भेंडी केंद्राला २४ तास वीजपुरवठा

कळवण : भेंडी येथील कांदा, डाळींब व द्राक्ष निर्यात सुविधा केंद्राला सुविधांसह एक्स्प्रेस फीडरद्वारे वीजपुरवठा सुरळीत करून देण्याबाबत पणन मंडळाचे व्यवस्थापक मिलिंद आकरे यांनी शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष व भाजपा तालुकाध्यक्ष सुधाकर पगार यांना आश्वासन दिल्यामुळे एक्स्प्रेस फीडरद्वारे २४ तास वीजपुरवठा उपलब्ध होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.
फेब्रुवारी महिन्यात याबाबत निविदा निघणार असून, निधी मंजूर असल्याचे सहकार विभागाने सांगितले.शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष सुधाकर पगार यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश महाजन, सहकारमंत्री चंद्रकांत पाटील, सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांची भेट घेऊन निवेदन दिले होते.
शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष सुधाकर पगार यांनी याबाबत बोलताना सांगितले की, शेतकरी सहकारी संघ व पणन मंडळाच्या सहकार्याने भेंडी येथे कांदा, डाळींब, द्राक्ष निर्यात सुविधा केंद्र बांधण्यात आले. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर अपूर्ण सुविधा पूर्ण करून देण्याच्या अटीवर तीन लाख रुपये अनामत व २१ हजार रुपये भाडे प्रती महिना ११ महिने कराराने दि. १ मे २०१२ ते १ मे २०१४ या कालावधीसाठी दि. १८ मे २०१४ रोजी करारनामा करून चालविण्यास दिले होते.
मात्र आजपावेतो अटींप्रमाणे विद्युतपुरवठा व प्रकल्पाच्या इतर अपूर्ण सुविधा पूर्तता न झाल्याने संस्थेने पणन कार्यालयाशी वारंवार लेखी पत्रव्यवहार व शिष्टमंडळाने समक्ष भेट घेऊनही काम पूर्ण होत नव्हते.
भ्रमणध्वनीवरून आमदार राहुल अहेर यांच्याशी पणन मंडळाचे व्यवस्थापक मिलिंद आकरे यांनी संपर्क साधून सदर असुविधांबाबत चर्चा केली असता एक्स्प्रेस फीडरची निविदा काढण्यात आली असून, इतर सुविधा तत्काळ पूर्ण करून देण्याचे आश्वासन दिले असे शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष सुधाकर पगार यांनी सांगितले. (वार्ताहर)

Web Title: 24-hour electricity supply to Vhendi center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.