२४ एकांकिकांची नाशिककरांना पर्वणी
By Admin | Updated: November 1, 2015 21:40 IST2015-11-01T21:39:32+5:302015-11-01T21:40:25+5:30
बाबाज् करंडक : दोन दिवस रंगणार स्पर्धा

२४ एकांकिकांची नाशिककरांना पर्वणी
नाशिक : लायन्स क्लब आॅफ नाशिक व बाबाज् थिएटर यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात येत्या ६ व ७ नोव्हेंबर रोजी राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा ‘बाबाज् करंडक’चे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त नाशिककरांना २४ एकांकिकांची पर्वणी लाभणार आहे.
परशुराम साईखेडकर नाट्यगृहात सकाळी ९ ते रात्री १० या वेळेत ही स्पर्धा रंगणार आहे. दि. ६ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता विनोद कपूर यांच्या हस्ते उद्घाटन होणार असून, प्रमुख पाहुणे म्हणून उमेश सोनवणे, प्रकाश पाटील, दिवाकर रत्नपारखी, सुरेश पाटील उपस्थित राहणार आहेत. स्पर्धाप्रमुख म्हणून प्रवीण कांबळे आहेत. महोत्सवास उपस्थित राहण्याचे आवाहन प्रशांत जुन्नरे यांनी केले आहे.
एकांकिका अशा : दि. ६ : ज्योतीने ज्योत जागवा (इच्छापूर्ती कलामंच, नाशिक), झिकीन झोको (मयुरी थिएटर, नाशिक), सत्यमेव जयते (जिजाई थिएटर, नाशिक), तहान (पडसाद, नाशिक), मनमोहन आणि ती (कलासंगम, मुंबई), पाझर (विनय महाविद्यालय, जळगाव), कॉमन लाइफ (ध्यास, औरंगाबाद), पाणी रे (श्री साई सान्निध्य क्रिएशन, मुंबई), उचल (सृष्टी, औरंगाबाद), कदाचित (सरस्वती भुवन महाविद्यालय, औरंगाबाद), आकडा (लोकरंगभूमी, औरंगाबाद), आसक्ती (द शॉ क्रिएटर्स, नाशिक), देवदासी (डॉ. आंबेडकर विद्यापीठ, औरंगाबाद), दि. ७ : एव्हरी डे इज संडे (नाट्यसेवा, नाशिक), हे गेले (टी स्कूल, पुणे), बायकांत पुरुष लांबोडा (टी स्कूल, पुणे), जनतेशी भेट घडवा (टी स्कूल, पुणे), प्रति गांधी (व्यक्ती, पुणे), अनुत्तरित (रंगसुगंध, मुंबई), मित्रा (फोर्थ वॉल, ठाणे), एकूट समूह (संक्रमण, पुणे), ड्रायव्हर (अहमदनगर थिपसेन), वारुळातील मुंगी (श्री, अहमदनगर), तो पाऊस आणि टाफेटा (अश्व थिएटर्स, मुंबई). (प्रतिनिधी)