जिल्ह्यात २२९ कोरोनामुक्त !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 01:02 IST2021-02-23T23:06:04+5:302021-02-24T01:02:43+5:30
नाशिक- जिल्ह्यात कोरोना बाधीतांची संख्या वाढत असून तरी मंगळवारी (दि.२३) काहीसा दिलासा मिळाला. दिवसभरात २७१ नवे रूग्ण आढळले असले तरी एकुण २२९ रूग्ण बरे झाले असून त्यांना घरी पाठवण्यात आले.

जिल्ह्यात २२९ कोरोनामुक्त !
नाशिक- जिल्ह्यात कोरोना बाधीतांची संख्या वाढत असून तरी मंगळवारी (दि.२३) काहीसा दिलासा मिळाला. दिवसभरात २७१ नवे रूग्ण आढळले असले तरी एकुण २२९ रूग्ण बरे झाले असून त्यांना घरी पाठवण्यात आले. विशेष म्हणजे मंगळवारी एकाही रूग्णाचा मृत्यू झालेला नाही.चालू महिन्यात १० फेब्रुवारीपासून रूग्ण संख्या वाढत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाला कठोर निर्णय घ्यावे लागत आहे. तथापि, रूग्ण संख्या वाढतच आहे. मंगळवारी (दि.२३) दिवसभरात २७१ रूग्ण आढळले असून यात नाशिक शहरातील १९३, मालेगाव महापालिकेतील १० रूग्ण असून ग्रामीण भागातील ५७ रूग्णांचा समावेश आहे. जिल्हाबाह्य ११ रूग्ण आढळले आहेत.
तर एकाही रूग्णाचा मृत्यू झालेला नाही. सध्या जिल्ह्यात १ हजार ९८३ रूग्ण उपचार घेत आहेत.
नाशिक शहरात १९३ रूग्ण आढळलल्याने शहरातील उपचार घेणाऱ्या रूग्णांची संख्या १ हजार ३६७ झाली आहे. शहरात आत्तापर्यंत ७६ हजार ७२२ रूग्ण आढळले असून गत वर्षी मार्च एप्रिलपासून आत्तापर्यंत १ हजार ३५ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर जिल्ह्यातील एकुण कोरोना बळींची संख्या २ हजार ९० झाली आहे.