ओझर परिसरात आढळले २२ नविन बाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2020 01:29 IST2020-08-01T19:37:05+5:302020-08-02T01:29:21+5:30
ओझर : गेल्या अनेक दिवसेंदिवस कोरोना बांधितांचा आकडा वाढच असून शनिवारी (दि.१) एचएएल कामगार वसाहत असलेल्या एचएएल हॉस्पिटल मधील २५ डॉक्टर व कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून ओझरला एकूण रु ग्ण संख्या १८४ झाली आहे.

ओझर परिसरात आढळले २२ नविन बाधित
ओझर : गेल्या अनेक दिवसेंदिवस कोरोना बांधितांचा आकडा वाढच असून शनिवारी (दि.१) एचएएल कामगार वसाहत असलेल्या एचएएल हॉस्पिटल मधील २५ डॉक्टर व कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून ओझरला एकूण रु ग्ण संख्या १८४ झाली आहे. यापैकी चौघांचा मृत्यू झाला असून ९५ रु ग्ण बरे होऊन परत आले असून ८५ रु ग्णांवर उपचार सुरू आहे.
दरम्यान वाढत्या रु ग्ण संख्येमुळे प्रशासनाच्या वतीने योग्य ती खबरदारी घेतली जाते आहे. परंतु एच. ए. एल कारखान्यात कामासाठी नाशिक जिल्ह्याभरातून येणाºया कामगारांच्या हलगर्जीपणामुळेच असे रु ग्ण वाढत असल्याची चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे. तर कामगार आपल्या उपचारासाठी शहरातुन एचएएल हॉस्पिटलमध्ये येत असून अनेक कर्मचाऱ्यांना त्यामुळेच लागण झाली असल्याची शंका नागरिकांना व्यक्त केली आहे.
ग्रामपंचायतीच्या वतीने गडाख कॉर्नर धन्वंतरी कॉर्नर येथून गावात येण्यासाठी मुख्य रस्तावरून चारचाकी चाकी वाहनांना गावात येण्यासाठी बंद करण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे बाजारपेठेतील सर्व दुकानांचा कालावधी सायंकाळी ग्रामपंचायतीच्या वतीने दोन तास वाढवण्यात आला असून काटेकोरपणे सायंकाळी सात वाजेपर्यंत दुकाने बंद करण्यात यावे असे आवाहन ग्रामपंचायत प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तर सर्व नागरिकांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन तालुका अधिकारी डॉ. चेतन काळे, अनिल राठी यांनी केले आहे.