जिल्ह्यात २१६ रुग्ण कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:35 IST2021-01-13T04:35:46+5:302021-01-13T04:35:46+5:30

नाशिक : जिल्ह्यात शनिवारी (दि. ९) एकूण २१६ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून नवीन २७३ रुग्णांची वाढ झाली आहे. दरम्यान, ...

216 patients corona free in the district | जिल्ह्यात २१६ रुग्ण कोरोनामुक्त

जिल्ह्यात २१६ रुग्ण कोरोनामुक्त

नाशिक : जिल्ह्यात शनिवारी (दि. ९) एकूण २१६ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून नवीन २७३ रुग्णांची वाढ झाली आहे. दरम्यान, काल केवळ नाशिक ग्रामीण परिसरातच दोघांचा मृत्यू झाला असून एकूण बळींची संख्या २,०१० झाली आहे.

नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत बाधित झालेल्या रुग्णांची संख्या १ लाख १२ हजार २९३ वर पोहोचली असून, त्यातील १ लाख ८ हजार ५८२ रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत, तर १,७०१ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची सरासरी टक्केवारी ९६.७० वर पोहोचली आहे. त्यात नाशिक शहरात ९७.२५, नाशिक ग्रामीण ९६.१०, मालेगाव शहरात ९२.७८, तर जिल्हाबाह्य ९३.६४ असे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आहे. जिल्ह्यात आतापर्यंत करण्यात आलेल्या चाचण्यांची संख्या ४ लाख ५६ हजार ४२८ असून, त्यातील ३ लाख ४२ हजार ५२२ रुग्ण निगेटिव्ह, तर १ लाख १२ हजार २९३ रुग्ण बाधित आढळून आले असून, १ हजार ६१३ रुग्णांचे अहवाल प्रलंबित आहेत.

Web Title: 216 patients corona free in the district