शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

२० हजार पक्ष्यांचे आगमन; नांदूरमधमेश्वर अभयारण्यात किलबिलाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 17:24 IST

नाशिक : दरवर्षी नाशिकमधील निफाड येथील चापडगाव शिवारातील नांदूरमध्यमेश्वर  पक्षी अभयारण्यात गुलाबी थंडी जाणवू लागताच होताच स्थलांतरित देशी-विदेशी पक्ष्यांच्या आगमनाला सुरुवात होते; मात्र यावर्षी परतीच्या पावसाने ओढ दिल्याने नांदूरमधमेश्वर अभयारण्यात किलबिलाट ऐकू येऊ लागला आहे. पक्षी प्रगणनेअंतर्गत विविध प्रजातीच्या सुमारे २० हजार ६९१ पक्ष्यांचा अभयारण्यामधील पाणथळ व गवताळ जागेत अधिवास ...

ठळक मुद्दे२० हजार ६९१ पक्ष्यांचा अभयारण्यामधील पाणथळ व गवताळ जागेत अधिवास अभयारण्य पक्ष्यांच्या किलबिलाटामुळे यावर्षी लवकरच गजबजले.

नाशिक : दरवर्षी नाशिकमधील निफाड येथील चापडगाव शिवारातील नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात गुलाबी थंडी जाणवू लागताच होताच स्थलांतरित देशी-विदेशी पक्ष्यांच्या आगमनाला सुरुवात होते; मात्र यावर्षी परतीच्या पावसाने ओढ दिल्याने नांदूरमधमेश्वर अभयारण्यात किलबिलाट ऐकू येऊ लागला आहे. पक्षी प्रगणनेअंतर्गत विविध प्रजातीच्या सुमारे २० हजार ६९१ पक्ष्यांचा अभयारण्यामधील पाणथळ व गवताळ जागेत अधिवास आढळून आल्याने आनंदाचे वातावरण पसरले आहे.

अभयारण्य परिसर पक्ष्यांच्या किलबिलाटामुळे यावर्षी लवकरच गजबजले. त्यामुळे वन्यजीव नांदूरमधमेश्वर अभयारण्य कार्यालयाच्या वतीने नुकतीच पक्षी प्रगणना विविध पक्षिमित्र व वन्यजीव अभ्यासकांच्या मदतीने वन्यजीव विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पार पाडली. याअंतर्गत जलाशयाच्या पाणथळ जागेत १९ हजार ४०५, तर परिसरातील गवताळ प्रदेशात तसेच वृक्षराजीवर एक हजार २८६ असे एकूण २० हजार ६९१ पक्ष्यांची मोजदाद करण्यास यश आले. दुर्बिणी, टेलिस्कोपच्या सहाय्याने अभयारण्यक्षेत्रातील विविध निरीक्षण मनो-यांवरून पक्षिमित्रांनी गणना पूर्ण केली. जलाशयाच्या पाण्याची पातळी कमी झाली असून, भरपूर खाद्य उपलब्ध असल्यामुळे पक्ष्यांच्या आगमनाला गती मिळाली आहे. आॅक्टोबरच्या पंधरवड्यापर्यंत अभयारण्य पूर्णपणे विविध देशी-विदेशी स्थलांतरित पक्ष्यांनी गजबजलेले पहावयास मिळणार आहें.

टॅग्स :Nashikनाशिकnandurmadhmwshwerनांदूरमधमेश्वरbirds sanctuaryपक्षी अभयारण्य