वालदेवी नदीपात्रातून २०० ट्रक गाळ काढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2016 22:51 IST2016-05-28T22:50:11+5:302016-05-28T22:51:59+5:30

वालदेवी नदीपात्रातून २०० ट्रक गाळ काढला

200 truck sludge removed from Valdevi river bed | वालदेवी नदीपात्रातून २०० ट्रक गाळ काढला

वालदेवी नदीपात्रातून २०० ट्रक गाळ काढला

नाशिकरोड : शिवसेनेच्या वतीने ‘वालदेवी नदी स्वच्छता अभियान’ हाती घेण्यात आले असून, शुक्रवारी अभियानाच्या तिसऱ्या दिवशी दोन फोकलॅन्ड मशीनच्या साह्याने नदीपात्रातील जवळपास २०० ट्रक गाळ उपसण्यात आला.
रोकडोबावाडी ते चेहेडी पंपिंगपर्यंत वालदेवी नदीपात्र स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. स्वच्छता मोहिमेच्या तिसऱ्या दिवशी दोन पोकलॅन्ड मशीनच्या साह्याने नदीपात्राच्या चारीतील जवळपास २०० ट्रक गाळ उपसून बाहेर काढण्यात आला. तसेच कोरडेठाक असलेल्या नदीपात्रातील मोठमोठे दगड, खडक, जेसीबी व पोकलॅन्ड मशीनच्या साह्याने नदीपात्राच्या दोन्ही बाजूच्या कडेला लावण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. शिवसैनिकांनी व आजूबाजूच्या परिसरातील नागरिक, युवक, लहान मुलांनी नदीपात्रातील मातीत अडकलेले, कुजलेले कपडे, प्लॅस्टिकच्या पिशव्या आदि वस्तू गोळा करून नदीपात्र स्वच्छ करत
आहे. (प्रतिनिधी)

Web Title: 200 truck sludge removed from Valdevi river bed