जिल्ह्यातील २०० शिक्षक पाच महिन्यांपासून विनावेतन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:14 IST2021-07-30T04:14:21+5:302021-07-30T04:14:21+5:30
२०१६ पासून २० टक्के अनुदान घेतलेल्या शाळांमधील शिक्षकांचे वेतन बंद केले आहे. यात नाशिक व पुणे जिल्ह्यातील शिक्षकांचा समावेश ...

जिल्ह्यातील २०० शिक्षक पाच महिन्यांपासून विनावेतन
२०१६ पासून २० टक्के अनुदान घेतलेल्या शाळांमधील शिक्षकांचे वेतन बंद केले आहे. यात नाशिक व पुणे जिल्ह्यातील शिक्षकांचा समावेश आहे. राज्यातील इतर सर्व जिल्ह्यांमध्ये ४० टक्के अनुदानासाठी अपात्र झालेल्या शाळांमधील शिक्षकांना २० टक्के प्रमाणे नियमित वेतन अदा केले जात आहे. नाशिक जिल्ह्यात मात्र त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. या संदर्भात नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघाने प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी राजीव म्हसकर यांची भेट घेऊन त्यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. वेतन अधीक्षक गणेश फुलसुंदर यांच्याकडून माहिती घेतली असता शासनाने या शिक्षकांचे वेतन थांबविल्याचे त्यांनी सांगितले. मुळात शिक्षण विभागाने शासनाकडे अनुदानाची मागणी करणे अपेक्षित होते. परंतु, ४० टक्के वेतन मिळण्याच्या अपेक्षेत असलेल्या शिक्षकांच्या हातून २० टक्के अनुदानही गेल्याने गेल्या पाच महिन्यापासून त्यांना बिनपगारी काम करावे लागत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सुमारे दोनशे शिक्षकांवर उपासमारीची वेळ आली आहे. हा प्रश्न त्वरित मार्गी न लावल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघाने दिला आहे.
जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव एस. बी. देशमुख, गुफरान अन्सारी, प्रकाश पानपाटील, बी. डी. गांगुर्डे, सचिन दिवे, एस. एस. जगदाळे, रोहित गांगुर्डे, एस. एस. नागरे, भाऊसाहेब मुरकुटे यांनी यासंदर्भात शिक्षणाधिकारी राजीव म्हसकर यांच्याशी चर्चा केली. अभिनव आदर्श मराठी शाळेतील मुख्याध्यापिका ऊर्मिला भालके, सुरेखा कान्हे, स्मिता धीवर, कीर्ती ह्याळीज, वैशाली नागरे, संजय जंजाळ, मंजूषा महाजन, कामिनी राणे, ज्योती पाटील, वंदना भोसले, वैशाली साबळे आदी यावेळी उपस्थित होते.
कोट...
शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी शिक्षण संचालक, शिक्षण आयुक्त तसेच शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याशी यासंदर्भात चर्चा केली जाईल. पदवीधर आमदार डाॅ. सुधीर तांबे, शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्यामार्फत या प्रश्नाचा शासन दरबारी पाठपुरावा करून शिक्षकांना न्याय मिळवून देऊ.
- एस. बी. देशमुख, सचिव, नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघ.
फोटो - २९ सिन्नर टिचर
खासगी प्राथमिक शाळांच्या शिक्षकांचे वेतन त्वरित करण्यात यावे, या मागणीचे निवेदन शिक्षणाधिकारी राजीव म्हसकर यांना देताना जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव एस. बी. देशमुख यांच्यासह पदाधिकारी.
290721\29nsk_4_29072021_13.jpg
खासगी प्राथमिक शाळांच्या शिक्षकांचे वेतन त्वरित करण्यात यावे, या मागणीचे निवेदन शिक्षणाधिकारी राजीव म्हसकर यांना देताना जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव एस. बी. देशमुख यांच्यासह पदाधिकारी.