शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांनी खरपूस समाचार घेतला; निलेश लंकेंनी वेगळाच आरोप करत वादाची दिशा बदलली!
2
Amit Shah : "मोदी देशाचं नेतृत्व करत राहतील यात कन्फ्यूजन नाही"; अमित शाह यांचा केजरीवालांवर पलटवार
3
मोठी बातमी: DC ची अडचण वाढली, रिषभ पंतवर एका सामन्याची बंदी अन् ३० लाखांचा दंड
4
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   
5
धोनीला नक्की काय झालं? सामना संपल्यानंतर पुरस्कार स्वीकारण्यासाठी न आल्याने रंगली चर्चा
6
Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले
7
लोकसभेच्या निकालानंतर संजय राऊत, उद्धव ठाकरे यांना अज्ञातवासात जावं लागेल, चंद्रशेखर बावनकुळेंचा टोला
8
२७ वर्षांनंतर सिनेइंडस्ट्रीला रामराम करून अध्यात्माकडे वळली अभिनेत्री, बनली साध्वी
9
"सत्तेचा गैरवापर करणे ही पंतप्रधान मोदींची खासियत"; शरद पवार यांचा शिरूरमधून हल्लाबोल
10
एक-एक गोष्टी बदलत आहेत, हे मंदिर मी उभं केलंय...; Rohit Sharma चा व्हिडीओ KKRकडून डिलीट
11
औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 
12
'भाजप पुन्हा जिंकला तर उद्धव ठाकरे तुरुंगात जातील'; केजरीवालांचा गंभीर आरोप
13
Patel Engineering Ltd: वर्षभरात पैसे दुप्पट, ३ वर्षांपासून शेअर देतोय जबरदस्त रिटर्न; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...
14
POK मध्ये युद्धजन्य परिस्थिती; पाकिस्तानच्या दादागिरीविरोधात काश्मिरी जनता रस्त्यावर
15
EPFO: तुमचा मोबाइल नंबर बदलला असेल तर घरबसल्या कसा कराल अपडेट? पाहा प्रोसेस
16
'आता KKRला सोडून जाऊ नको' म्हणत चाहत्याला फुटलं रडू, प्रेम पाहून गौतम गंभीरही झाला नि:शब्द (video)
17
भारीच! 18 तास काम केल्यावर 1000 रुपये मिळायचे; आता फुलांच्या शेतीतून झाला करोडपती
18
Fact Check : "मी तुम्हाला बेरोजगार करेन..."; योगी आदित्यनाथ यांच्या Video मागचं जाणून घ्या, 'सत्य'
19
मसाल्यांमधील ETO केमिकल्सवर सरकार अंकुश लावण्याच्या तयारीत, निर्यातदारांना करावं लागणार 'हे' काम

२०० वीजजोडण्या खंडित; थकबाकीदारांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 10:40 PM

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या पंचवटी विभागामार्फत १ एप्रिल २०१८ ते १७ मार्च २०१९ या आर्थिक वर्षात साडेअकरा महिन्यांच्या कालावधीत ठरवून दिलेल्या उद्दिष्टांपैकी ८१ कोटी ५० लाख रुपयांची वीज बिल वसुली करण्यात आली आहे. वीज वितरण कंपनीने यंदा पंचवटी विभागासाठी सुमारे ८४ कोटी ७६ लाख रु पयांचे वीज बिल वसुलीचे उद्दिष्ट ठेवले होते.

ठळक मुद्देवीज वितरण विभाग : ८१ कोटी ५० लाखांची वसुली

पंचवटी : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या पंचवटी विभागामार्फत १ एप्रिल २०१८ ते १७ मार्च २०१९ या आर्थिक वर्षात साडेअकरा महिन्यांच्या कालावधीत ठरवून दिलेल्या उद्दिष्टांपैकी ८१ कोटी ५० लाख रुपयांची वीजबिल वसुली करण्यात आली आहे. वीज वितरण कंपनीने यंदा पंचवटी विभागासाठी सुमारे ८४ कोटी ७६ लाख रु पयांचे वीज बिल वसुलीचे उद्दिष्ट ठेवले होते.वीज वितरण कंपनीचे पंचवटी विभागात मखमलाबाद नाका दिंडोरीरोड, आडगाव नाका, बाजार समिती परिसर, तपोवन व पंचवटी गावठाण असे सहा कक्ष कार्यालय आहेत. या सहा कक्ष कार्यालयाच्या अखत्यारित सुमारे ७५ हजार वीजग्राहक आहेत. यापैकी निवासी घरगुती विजेचा वापर करणाऱ्या ग्राहकांची संख्या ६७ हजार इतकी, तर आठ हजार व्यावसायिक वापर करणाऱ्या वीजग्राहकांची संख्या आहे. वीज वितरण कंपनीच्या कक्षेत येणाºया विभागांमध्ये उच्चभ्रू वसाहत तसेच झोपडपट्टी परिसराचादेखील समावेश आहे.वीज वितरण कंपनीने पंचवटी विभागाला ठरवून दिलेल्या ८४ कोटी ७६ लाख रु पयांच्या उद्दिष्टांपैकी सुमारे ८१ कोटी ५० लाख रु पयांची वीज बिल वसुली करण्यात आल्याने यंदाच्या वर्षी अंदाजे ९८ टक्केवीज बिलाची रक्कम वसुली झाली आहे.विज देयके अदा केल्यानंतर देखील वीज देयकांची रक्कम थकविणाºया थकबाकीदारांविरुद्ध कारवाई करण्यात आलेल्या वीजग्राहकांची संख्या २००हून अधिक असल्याचे पंचवटी वीजवितरण कंपनी मार्फत सांगण्यात आले आहे.मोबाइलद्वारे संदेश नोटिसावीजग्राहकांनी वेळेत वीज बिल भरणा करावा यासाठी सुमारे १६ हजार ६४६ वीजग्राहकांना मोबाइलद्वारे संदेश नोटिसा पाठविण्यात आल्या होत्या. थकबाकीदारांकडून वीजदेयकांची वसुली करण्यासाठी विभागात १५० वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. यामध्ये कक्ष अधिकारी, सहायक अभियंता, वायरमन व कार्यालयीन कर्मचाºयांचा समावेश आहे.

टॅग्स :Nashikनाशिकelectricityवीजbillबिल