अज्ञात आजाराची २०० जणांना बाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 20:22 IST2021-03-22T20:21:46+5:302021-03-22T20:22:08+5:30

वेळुंजे (त्र्यंबकेश्वर) : हरसूलजवळील जातेगाव येथे ग्रामस्थांचे हात, पाय सुजणे, दुखणे या अज्ञात आजाराने २०० हून अधिक ग्रामस्थांना अनेक दिवसांपासून बाधा होत आहे. मात्र, तालुका आरोग्य प्रशासनासह जिल्हा आरोग्य प्रशासन अजूनही बेफिकीर असल्याचे दिसून येते.

200 people infected with unknown disease | अज्ञात आजाराची २०० जणांना बाधा

अज्ञात आजाराची २०० जणांना बाधा

ठळक मुद्देआरोग्य विभागाचा हलगर्जीपणा : जिल्हा प्रशासनाने तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी

वेळुंजे (त्र्यंबकेश्वर) : हरसूलजवळील जातेगाव येथे ग्रामस्थांचे हात, पाय सुजणे, दुखणे या अज्ञात आजाराने २०० हून अधिक ग्रामस्थांना अनेक दिवसांपासून बाधा होत आहे. मात्र, तालुका आरोग्य प्रशासनासह जिल्हा आरोग्य प्रशासन अजूनही बेफिकीर असल्याचे दिसून येते.

जातेगावकरांच्या जिवाशी आरोग्य विभागाने खेळ मांडला असून, जिल्हा प्रशासनाने संबंधित ठिकाणी तज्ज्ञ पथक पाठवून, त्यासबंधी तत्काळ उपाययोजना कराव्यात, अन्यथा दोन दिवसांत कोरोना काळात त्र्यंबकेश्वर तालुका किसान सभेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, असे माकपचे जिल्हा सेक्रेटरी इरफान शेख यांनी सांगितले. जातेगाव (ता.त्र्यंबकेश्वर) येथे गेल्या अनेक दिवसांपासून ग्रामस्थांच्या हात, पायाला सूज, तसेच अंगदुखीच्या व्याधी जडत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या प्राथमिक उपचारानंतर ही रुग्णांची अवस्था कायम आहे. त्यातच केंद्रात उपयुक्त पुरेशा उपाययोजना नसल्याने शेकडो ग्रामस्थ या अज्ञात रोगाच्या प्रादुर्भावापासून बाधित झाले आहे. यामुळे ग्रामस्थांना या अज्ञात रोगाच्या प्रादुर्भावाचा मनस्वी मनस्ताप सहन करावा लागला आहे.
तालुका प्रशासनासह जिल्हा प्रशासनाने पाठ फिरविल्याचे चित्र दिसत आहे. जिल्हा आरोग्य प्रशासनाने संबंधित बाबींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केला असल्याचा आरोप करण्यात येत आहे. मात्र, तालुका प्रशासन ही डोळेझाक करीत आहे. यामुळे दिवसेंदिवस येथे ग्रामस्थांच्या व्याधीत भर पडत आहे.

त्र्यंबकेश्वर तालुक्यात आरोग्य विभागाच्या अनेक तक्रारी दिवसागणिक येत आहेत. त्यात उपकेंद्र नेहमीच बंद अवस्थेत, तर कधी वैद्यकीय अधिकाऱ्यांची दांडी यामुळे येथील आदिवासी बहुल भागात आरोग्यसेवेचा पुरता फज्जा उडाला आहे. जातेगाव येथील ग्रामस्थांना अज्ञात रोगांचा झालेला प्रादुर्भाव आरोग्य विभागाने दोन दिवसांत मनावर घेतला नाही, तर त्र्यंबकेश्वर किसान सभेच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल. होणाऱ्या परिणामास तालुका व जिल्हा आरोग्य विभाग जबाबदार असेल.
- इरफान शेख, माकप जिल्हा सेक्रेटरी

Web Title: 200 people infected with unknown disease

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.