बागलाण तालुक्यात कोरोना बाधित २०० पार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2020 00:02 IST2020-08-11T20:58:03+5:302020-08-12T00:02:14+5:30
सटाणा : बागलाण तालुक्यात कोरोना बाधीत रूग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस भर पडत असुन मंगळवार (दि.११३ अखेर हा आकडा दोनशे पार झाला आहे. कोरोना बळींचा आकडा ११ वर गेला आहे. दोनच दिवसात तब्बल २५ करोना पॉझिटिव्ह तर १०३ संशियत रूग्ण आढळून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. दरम्यान सटाणा शहर वगळता बाधित सापडलेल्या प्रत्येक गावात पुन्हा लॉक डाऊन करण्याचा निर्णय गावकऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने घेतला आहे.

मंगळवारी (दि.११) सायंकाळी उशीरा दोन दिवसांच्या प्राप्त झालेल्या अहवालात तालुक्यात तब्बल २५ रूगणांध्ये सटाणा शहरात ७ नामपूर ८, जायखेडा ७ व अंतापूर , डांगसौंदाणे, वटार येथे प्रत्येकी एक कोरोना पोझिटिव्ह रूग्ण आढळून आले आहेत. गेल्या दोन ते तिन दिवसांपासून सटाणा शहरासह नामपूर , जायखेडा येथे रु ग्णांची वाढ होत आहे. नामपूर येथे एकाच कुटुंबात ७ व इतर १५ असे २२ रु ग्ण आढळून आले आहेत. सटाणा, जायखेडा हे जादा लोकसंख्या असलेल्या गावांमध्येही त्या तुलनेत बºयापैकी रु ग्ण संख्या वाढत असल्याने हे तिन्ही गावे हॉटस्पॉट म्हणून ओळखले जाऊ लागले आहेत . सटाणा शहरात गेल्या दोन दिवसात सात रु ग्णांची भर पडली असुन यामध्ये भाक्षी रोड येथील शिक्षक कॉलनीत २३ वर्षीय तरु ण, मालेगाव रोड वरील पेट्रोल पंप जवळ भुतेकर गल्लीत ६२ वर्षीय महिला, ३० वर्षीय पुरु ष, पिंपळेश्वर भागातील तरूण व चाळीस वर्षीय महिला बाधित असल्याचे आढळून आले. जायखेडा येथे पाच पुरु ष व २ महिला आढळून आले . डांगसौंदाणे येथे ६७ वर्षीय पुरु ष आढळून आला . दरम्यानी या बाधितांच्या संपर्कात आलेल्या १०३ जणांना विलगीकरण केंद्रात भरती करण्यात आले असुन त्यांचे स्वॅब तपासणीसाठी नाशिक येथे पाठविण्यात आले आहेत. त्याचा अहवाल बुधवारी सायंकाळ पर्यंत येणे अपेक्षित असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.