नाशिक : जिल्ह्याची कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढू लागली आहे. शनिवारच्या तुलनेत सोमवारी (दि.७) जिल्ह्यात रुग्ण वाढल्याचे दिसून आले. दिवसभरात १ हजार १४९ रुग्ण आढळून आले आहे. यामुळे एकूण रुग्णसंख्या ४४ हजार ८३९ इतकी झाली आहे. दिवसभरात २० रु ग्णांचा उपचारादरम्यान मृत्यु झाल्याने आता बळींचा एकूण आकडा ९५३वर पोहचला आहे. दिवसभरात १ हजार ८६ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली. मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये शहरातील १२ रुग्णांचा समावेश आहे.मागील दोन दिवसांपासून शहरासह जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली आहे. सण-उत्सवाच्या काळापासून कोरोनाग्रस्तांचा आलेख उंचावत असून अद्याप घसरण होत नसल्याने प्रशासनही चिंतित झाले आहे.सोमवारी दिवसभरात जिल्हयात १ हजार ५७० संशियत रु ग्ण उपचारासाठी दाखल झाले आहेत. यापैकी १ हजार २१७ रु ग्ण शहरातील आहे. १ हजार १४९ रुग्णांमध्ये नाशिक शहरातील ७३४, ग्रामीणमधील ३४३ तर मालेगावातील ७२ रुग्णांचा समावेश आहे. शहराची कोरोनाबाधितांची एकूण संख्या आता ३० हजार ७८७ झाली आहे, तर ग्रामिणचा कोरोनाबाधितांचा आकडा १० हजार ९०५ इतका झाला आहे. शहरात आतापर्यंत २६ हजार ३८ रुग्ण तर ग्रामिणमध्ये ७हजार७६९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मालेगाव मनपा हद्दीत एकूण रुग्णसंख्या २ हजार ९०३ इतकी असून त्यापैकी २हजार१४० रुग्ण बरे झाले आहेत.सोमवारी ग्रामिण भागात उपचारार्थ दाखल ७ रुग्ण दगावले तर मालेगावात एका रुग्णाचा मृृत्यू झाला. मागील तीन ते चार दिवसांपासून जिल्ह्यातील ग्रामिण भागातील रुग्णसंख्या कमी झाली होती; मात्र रविवारपासून पुन्हा रुग्णसंख्या साडेतीनशेपर्यंत जाऊन पोहचली आहे. यापाठोपाठ मालेगावातही आता रुग्ण हळुहळु वाढू लागले आहे. तसेच मागील काही दिवसांपासून दररोज एक रुग्ण मृत्युमुखी पडत आहे. एकूणच शहरासह जिल्ह्यातही कोरोनाचे संक्रमण वाढता वाढत असल्याने गाव, तालुकापातळीवरसुध्दा नागरिकांनी अधिकाधिक सतर्कता बाळगण्याची गरज आहे.जिल्ह्यात आतापर्यंत ३६ हजार १५२ रुग्ण बरे झाले आहेत तर ७ हजार ७३४ रुग्ण सध्या उपचार घेत आहेत. १ हजार ८१४ रुग्णांचे नमुना चाचणी अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. आतापर्यंत एकूण १ लाख ४९ हजार ५९९ रुग्णांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
२०बळी : जिल्ह्यात १ हजार १४९ कोरोनाबाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2020 20:31 IST
१ हजार २१७ रु ग्ण शहरातील आहे. १ हजार १४९ रुग्णांमध्ये नाशिक शहरातील ७३४, ग्रामीणमधील ३४३ तर मालेगावातील ७२ रुग्णांचा समावेश आहे.
२०बळी : जिल्ह्यात १ हजार १४९ कोरोनाबाधित
ठळक मुद्देदिवसभरात १ हजार ८६ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात शहराची कोरोनाबाधितांची एकूण संख्या आता ३० हजार ७८७ ग्रामिणचा कोरोनाबाधितांचा आकडा १० हजार ९०५ एकूण रुग्णसंख्या ४४ हजार ८३९ इतकी झाली