शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

आडवाडी घाटात बस अपघातात २० शालेय विद्यार्थी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2019 17:04 IST

नाशिक जवळील घटना : चालकाने दाखवले प्रसंगावधान

ठळक मुद्देबस अचानक कडेला धडकल्याने बसमधील सगळे प्रवासी एकमेकांवर आदळले. त्यात अनेकाचे डोक तर अनेकाचे दात पडले आहे.

नाशिक : सिन्नर तालुक्यातील ठाणगावजवळील आडवाडी घाटात एसटीचा ब्रेक फेल झाल्याने अपघात होऊन २० शाळकरी विद्यार्थी जखमी झाले आहेत. चालकाने प्रसंगावधान दाखवत बस रस्त्याच्या कडेला नेल्याने मोठी दुर्घटना टळली.सिन्नर-आडवाडी बस (क्रमांक एमएच १४ बीटी ०४८३) ही आडवाडीवरु न शाळकरी मुले घेऊन साडेदहाच्या सुमारास ठाणगावकडे रवाना झाली होती. बस आडवाडी घाट पास करु न खाली उताराला लागली असता बसचे ब्रेक फेल झाल्याचे चालक भाऊसाहेब गायधनी यांच्या लक्षात आली. त्यांनी बसवर कसेबसे नियंत्रण मिळवत बस रस्त्याच्या कडेला असणाऱ्या डोंगरकपारीकडे नेली व गाडीतील ८० प्रवाशी विद्यार्थ्यांचा जीव वाचला. बस अचानक कडेला धडकल्याने बसमधील सगळे प्रवासी एकमेकांवर आदळले. त्यात अनेकाचे डोक तर अनेकाचे दात पडले आहे. या अपघातात पायल दत्तू गांजवे (१३) सोनाली रामनाथ सद्गीर (१४) साक्षी बाबूराव बिन्नर (१४) मोहिनी बिन्नर, आरती बिन्नर, अलका बिन्नर, सुचित्रा कोकाटे,राणी बिन्नर, सोनाली बिन्नर, शैला बिन्नर, वैभव गांजवे, समाधान मोखरे, योगेश बिन्नर, अमोल बिन्नर, सचिन बिन्नर, शुभम गांजवे, वैभव बिन्नर , बाबुराव गांजवे हे प्रवाशी जखमी झाले आहेत.  जखमींना तातडीने ठाणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले . चालक गायधनींचे कौतुकअपघातात बसचे चालक भाऊसाहेब गायधनी यांनी प्रसंगावधान राखल्याने प्रवाशांचे प्राण वाचविण्यात त्यांना यश आले. आडवाडी घाटात गाडीचे ब्रेक निकामी झाले असल्याचे गायधनी यांच्या लक्षात आले मात्र त्यांनी गियरच्या साहाय्याने घाट पास करून गाडीवर नियंत्रण मिळविण्यास यश मिळविले. पण घाट संपताच पुढे सर्वत्र उतार असल्याने त्यांनी गाडी डाव्या बाजूला डोंगराच्या कडेला धडकवली त्यामुळे जीवित हानी झाली नाही. गायधनी यांनी केलेल्या शर्थीच्या प्रयत्नाचे कौतुक होत आहे. 

 

टॅग्स :NashikनाशिकAccidentअपघात