पिंपळगाव रुग्णालयासाठी २० कोटी
By Admin | Updated: March 19, 2016 23:24 IST2016-03-19T23:18:40+5:302016-03-19T23:24:51+5:30
पिंपळगाव रुग्णालयासाठी २० कोटी

पिंपळगाव रुग्णालयासाठी २० कोटी
पिंपळगाव बसवंत : सध्या प्राथमिक आरोग्य केंद्रात येणाऱ्या रुग्णांची संख्या खूपच आहे. त्यासाठी
आहे ते कर्मचारीही कमी पडतात. सध्या पूर्ण जबाबदारीही या दोनच डॉक्टरांवर आहे. यासाठी त्या सुविधा रुग्णालय बांधकाम झाल्यावर मिळणार आहेत.
त्या सुविधा जर आत्ताच आहे त्या ठिकाणी चालू झाल्या तर रुग्णांच्या सोयीचे होईल.
डॉक्टरांची संख्या वाढेल, सुविधा वाढेल, औषधे वाढतील. रुग्णालयाची इमारत उभी राहण्यासाठी तीन ते चार वर्षांचा कालावधी लागणार आहे. तोपर्यंत या ठिकाणी शासनाने तत्काळ सुविधा उपलब्ध करून दिल्यास लगेच याचा फायदा रुग्णांना होईल.
२००० साली गिरणारे, डांगसौंदाणे या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय मंजूर झाले होते. पण याठिकाणी प्रशासनाने रुग्णालयाची इमारत होईपर्यंत सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या. त्याच धर्तीवर पिंपळगावच्या आरोग्य केंद्रात सुविधा उपलब्ध करून द्याव्या म्हणजे त्याचा लाभ तत्काळ रुग्णांना मिळेल.