नाशिक : महानगर शिवसेनेतर्फे पक्षाच्या ५५ व्या वर्धापन दिनानिमित्त महानगरात ठिकठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरांमधून तब्बल २ हजार २८१ पिशव्या रक्तसंकलन करण्यात आले. तसेच लाडू आणि छत्री वाटपासह अन्नदान आणि वृक्षारोपण आदी उपक्रम राबवून शिवसैनिकांनी शनिवारी (दि. १९ पक्षाचा वर्धापन दिन उत्साहात साजरा केला. यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा देताना अनेक शिवसैनिक भावुक झाल्याचे दिसून आले. नाशिक महापालिकेवर एकहाती सत्ता आणून बाळासाहेब ठाकरे आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे स्वप्न साकार करणारच, असा निर्धार महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी व्यक्त केला.
शालीमार येथील शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात सकाळी सत्यनारायण महापूजा झाली. या पूजेचे यजमानपद शिवसेना नाशिक जिल्हा कार्यालय प्रमुख राजेंद्र वाकसरे व त्यांच्या पत्नी शैलाजा यांनी भूषवले. पंडित तपन शुक्ला यांनी केले पुरोहित्य केले. तसेच वर्धापन दिनानिमित्त रविवार कारंजा येथे हेमलता टॉकीज, रोटरी क्लब हॉल (गंजमाळ), मनपा शाळा क्र. १२५, दत्तमंदिर रोड (नाशिक रोड), मारुती मंदिर (चेहडी पंपिंग), पॉलिटेक्निक कॉलेजशेजारी (सामनगाव रोड), बाळासाहेब ठाकरे रुग्णालय (सिंहस्थनगर), महात्मा फुले सभागृह, शिवाजी चौक (सिडको), गणपती मंदिर जाधव संकुल (चुंचाळे) आदी ८ ठिकाणी रक्तदान शिबिरे पार पडली. आतापर्यंत शिवसेनेने २ हजार २८१ पिशव्या रक्त संकलित केल्याचे महानगप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी सांगितले, तर नागरिकांच्या सदृढ आरोग्यासाठी शिवसेना कटिबद्ध असल्याचे माजी मंत्री बबनराव घोलप म्हणाले. सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी शिवसेनेने नाशकात रक्तदानाची मोठी चळवळ हाती घेतली असून, ४५ शिबिरांद्वारे झालेले रक्तसंकलन त्याचेच फलित असल्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी नमूद केले. यावेळी खासदार हेमंत गोडसे यांच्यासह मनपा विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, माजी जिल्हाप्रमुख सुनील बागूल, दत्ता गायकवाड, माजी आमदार वसंत गिते, योगेश घोलप, माजी महापौर विनायक पांडे, मनपा गटनेते विलास शिंदे, युवासेना जिल्हाधिकारी दीपक दातीर, राहुल ताजनपुरे, विद्यार्थी सेना जिल्हा संघटक वैभव ठाकरे, माजी महानगरप्रमुख सचिन मराठे, महेश बडवे, सूर्यकांत लवटे, जयश्री खर्जुल, चद्रकांत खाडे, अंबादास ताजनपुरे, योगेश म्हस्के, योगेश बेलदार, पुजाराम गामणे, पुंडलिक अरिंगळे, मंगला भास्कर, मंदा दातीर, शोभा मगर, शोभा गटकळ, अलका गायकवाड, ज्योती देवरे, प्रेमलता जुन्नरे, गुड्डी रंगरेज, लक्ष्मी ताटे, श्रद्धा दुसाने, शोभा दोंदे, शोभा दिवे आदींसह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.
दुपारनंतर सामाजिक उपक्रम
शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त दुपारनंतर विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. राजगृह बुद्ध विहार, राजीवनगर येथे घरकाम करणाऱ्या महिलांना सायंकाळी ४ च्या सुमारास छत्री वाटप करण्यात आले. तसेच नाशिक रोड येथे रिक्षाचालकांना अर्थसाह्य करून शिवसेनेने सामाजिक बांधिलकी जोपासली. याशिवाय ठिकठिकाणी लाडू वाटप, आरोग्य शिबिर, वृक्षारोपण मास्क वाटप, अन्नदान आदी विविध उपक्रम राबविण्यात आले. वीरेंद्रसिंग टिळे, नाना काळे, श्रीकांत मगर, आर.डी.धोंगडे, योगेश गाडेकर, विकास गिते, राहुल ताजनपुरे, ज्ञानेश्वर शिंदे, नगरसेवक किरण गामणे(दराडे), बाळा दराडे, शिवानी पांडे, नगरसेवक प्रवीण तिदमे, यशवंत पवार, सागर देशमुख, राजेंद्र नानकर आदींनी या विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते.
===Photopath===
190621\19nsk_53_19062021_13.jpg
===Caption===
शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित रक्तदान शिबिर प्रसंगी उपस्थित उपनेते बबन घोलप व महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर. समवेत अजय बोरस्ते, विरेंद्रसिंग टिळे, दत्ता गायकवाड, वसंत गीते, शोभाताई मगर, सुनील गोडसे, सीमा टिळे, योगेश घोलप आदी