शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

दोन लाखांचे १३ मोबाइल हस्तगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2019 23:56 IST

दुचाकीस्वार, पादचाऱ्यांचा मोबाइल हिसकावून पळ करणाºया अल्पवयीन चोरट्यांच्या टोळीचा गुन्हे शाखा युनिट-१च्या पथकाने छडा लावला. या टोळीमधील संशयित चोरटा अतीश विजय शहा (१९, रा. रामवाडी) यास अटक केली आहे.

नाशिक : दुचाकीस्वार, पादचाऱ्यांचा मोबाइल हिसकावून पळ करणाºया अल्पवयीन चोरट्यांच्या टोळीचा गुन्हे शाखा युनिट-१च्या पथकाने छडा लावला. या टोळीमधील संशयित चोरटा अतीश विजय शहा (१९, रा. रामवाडी) यास अटक केली आहे. तसेच त्याच्या दोन अल्पवयीन साथीदारांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून २ लाख ४७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अतीश शहा हा त्याच्या दोन अल्पवयीन साथीदारांच्या मदतीने दुचाकीवरून वेगवेगळ्या परिसरात भटकंती करत बोलत जाणाºया किंवा पादचाऱ्यांच्या हातातील मोबाइल हिसकावून पळ काढत होते. या त्रिकुटाने एप्रिलमध्ये गंगापूर, पंचवटी आणि उपनगर पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून तीन मोबाइल हिसकावून नेल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. १४ हजार, १५ हजार रुपयांचे मोबाइल हिसकावून नेले होते. तसेच या त्रिकुटाने डीजीपीनगर ते आंबेडकरनगर सिग्नल दरम्यान सलीम कय्युम शेख (४९, रा. डीजीपीनगर १) यांच्याकडील मोबाइल हिसकावून पोबारा केल्याचेही निष्पन्न झाले आहे. या तीनही जबरी चोरीच्या घटनांबाबत मंगळवारी (दि.२०) संबंधित पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच २५ जून रोजी रात्रीच्या सुमारास एक्सलो पॉइंटजवळ तुषार सुधाकर खिल्लारी (२८, रा. अंबड) यांच्याकडील १५ हजार रुपयांचा मोबाइल हिसकावून नेला होता. या प्रकरणी पोलिसांनी तपास करून तिघा संशयितांना ताब्यात घेतले. त्यावेळी या तिघांनी मोबाइल हिसकावल्याचे अनेक गुन्हे उघडकीस आले आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून विविध गुन्ह्यात वापरलेली दुचाकी, हिसकावून नेलेले १३ महागडे अ‍ॅन्ड्रॉइड मोबाइल जप्त केले आहेत. पोलीस निरीक्षक आनंदा वाघ, सहायक पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी, सचिन खैरनार, उपनिरीक्षक बलराम पालकर आदींच्या पथकाने ही कारवाई केली.पोलिसांच्या नाकाबंदीतून सुटका ?दोघा अल्पवयीन चोरट्यांसह हे त्रिकूट एकाच दुचाकीवरून शहरभर फिरत मोबाइल चोरीचे गुन्हे करत होते. दरम्यान, विना हेल्मेट तसेच क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवून दुचाकीवरून मिरवत असताना शहरातील विविध भागांमध्ये राबविल्या जाणाºया नाकाबंदीतून हे चोरटे कसे सुटले? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. ज्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत या त्रिकुटांच्या टोळीने गुन्हे केले त्या भागात पोलिसांची सातत्याने महत्त्वाच्या सर्वच नाक्यांवर संशयास्पद वाहनांची तपासणी केली जात असतानादेखील हे तिघे कसे सुटले.

टॅग्स :PoliceपोलिसMobileमोबाइलtheftचोरी