महिलेचे २ लाखांचे मंगळसूत्र हिसकावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:25 IST2021-02-18T04:25:25+5:302021-02-18T04:25:25+5:30
याबाबत अधिक माहिती अशी, अमृतधाम येथील दिगंबर हौसिंग सोसायटीमध्ये राहणाऱ्या वैशाली रामचंद्र ताडगे (४७) या गोविंदनगरमध्ये एका रुग्णालयात जात ...

महिलेचे २ लाखांचे मंगळसूत्र हिसकावले
याबाबत अधिक माहिती अशी, अमृतधाम येथील दिगंबर हौसिंग सोसायटीमध्ये राहणाऱ्या वैशाली रामचंद्र ताडगे (४७) या गोविंदनगरमध्ये एका रुग्णालयात जात असताना मंगळवारी (दि.१६) भर दुपारी ही घटना घडली. ताडगे यांनी या प्रकरणी फिर्याद दिली असून त्यांच्या गळ्यात ५५ ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र होते. यामध्ये एक त्रिकोणी पेंडलही होते. चोरट्यांनी भरधाव दुचाकीने येत त्यांची नजर चुकवून गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून धूम ठोकली.
शहर व परिसरात महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या खेचून पोबारा करण्याचे प्रकार पुन्हा वाढल्याने नाराजी व्यक्त होत आहे. काही दिवसांपूर्वीच म्हसरुळ पोलीस ठाणे हद्दीत अशाच प्रकारे महिलेची सोनसाखळी लंपास केल्याची घटना घडली होती. सोनसाखळी चोर शहरात सर्रासपणे मोकाट फिरत असताना पोलिसांना मात्र त्यांचा सुगावा लागत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.