शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

हतगड शिवारातून २७ लाखांचा अवैध मद्यसाठा हस्तगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2019 17:12 IST

चक्क पंजाब राज्यात निर्मित करण्यात आलेल्या व अरुणाचल प्रदेश या एकमेव राज्यात विक्रीस परवानगी असलेले मद्य आढळून आले.

ठळक मुद्देविभागीय भरारी पथकाने छापा मारून मद्यसाठा हस्तगत केला.१४ हजार ११२ सीलबंद बाटल्यांचे २९४ खोके जप्त६ हजार ६९६ सीलबंद टीनचे २७९ खोके हस्तगत

नाशिक : पंजाब राज्यात निर्मित केलेला व केवळ अरुणाचल प्रदेश व चंदीगढ केंद्रशासित प्रदेशात विक्रीस परवानगी असलेल्या मद्याची महाराष्टÑातील विविध जिल्ह्यांत निवडणूक कालावधीत विक्री करण्याच्या उद्देशाने हतगड शिवार येथील सावमाळ गावातील एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या आवारात दडवून ठेवलेला २७ लाख रुपये किमतीचा मद्यसाठा विभागीय भरारी पथकाने छापा मारून हस्तगत केला.विधानसभा निवडणूक प्रचाराचा ज्वर जिल्ह्यात वाढला असून, शहर व ग्रामीण भागात निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या उमेदवारांकडून प्रचारावर भर दिला जात आहे. दरम्यान, ओल्या पार्ट्या रंगण्याची शक्यता लक्षात घेत राज्य उत्पादन शुल्क विभाग सतर्क झाला आहे. विभागीय भरारी पथक ाने मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा, विभागीय उपआयुक्त अर्जुन ओहोळ यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी (दि.१३) सुरगाणा तालुक्यातील हतगड शिवार येथील सावळमाळ गावातील बांधकामस्थितीत असलेल्या इमारतीत छापा मारला. यावेळी पथकाच्या हाती मद्यसाठ्याचे मोठे घबाड लागले. यामध्ये चक्क पंजाब राज्यात निर्मित करण्यात आलेल्या व अरुणाचल प्रदेश या एकमेव राज्यात विक्रीस परवानगी असलेले मद्य आढळून आले. यावेळी निरीक्षक आर. एम. फुलझळके, दुय्यम निरीक्षक देवदत्त पोटे, एस. एस. रावते, लोकेश गायकवाड, दीपक आव्हाड, रामकृष्ण झनकर आदींच्या पथकाने झडतीसत्र राबविले. या कारवाईत एकूण २६ लाख ७१ हजार ५६० रुपये किमतीचे मद्याचे अवैधरीत्या साठा करून ठेवलेले सुमारे ५७३ खोके उत्पादन शुल्क विभागाने जप्त केले आहेत. या प्रकरणी सुनील लक्ष्मण खंबायत (२१, रा. हतगड) यास ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच मद्यसाठा पुरवठादार व विकत घेणाऱ्या मूळ विक्रेत्याचा पथकाद्वारे शोध घेतला जात आहे.असा आहे मद्यसाठा१८० मी.लिच्या ब्ल्यू व्हिस्कीच्या १४ हजार ११२ सीलबंद बाटल्यांचे २९४ खोके जप्त केले आहेत. हे मद्य केवळ अरुणाचल प्रदेशमध्ये विक्रीस परवानगी आहे. त्याची किंमत अंदाजे १८ लाख ३४ हजार ५६० रुपये इतकी असल्याचे पथकाने सांगितले.चंदीगढ राज्यात विक्रीसाठी असलेला जिन्सबर्ग प्रीमियम स्ट्रॉँग बियरच्या ५०० मी.लिचे ६ हजार ६९६ सीलबंद टीनचे सुमारे २७९ खोके पथकाने हस्तगत केले आहेत. त्याची किंमत सुमारे ८ लाख ३७ हजार रुपये इतकी आहे.

टॅग्स :NashikनाशिकExcise Departmentउत्पादन शुल्क विभागMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019