शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

बस व्यावसायात नफ्याचे आमिष दाखवून ५० लाखांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2019 15:57 IST

खाजगी प्रवाशी बस व्यावसायात गुंतवणूक केल्यास बस देण्याचे व नफ्यात दररोज दीड ते दोन लाख रुपये देण्याचे आमिष दाखवून उपनगर परिसरातील एका व्यक्तीची तब्बल पन्नास लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात पाच संशयितांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

ठळक मुद्देकर्नाटकातील संशयितांकडून नाशिकच्या व्यावसयिकाची फसणूक प्रवाशी बस व्यावसायात नफ्याचे आमिष दाखवून 43 लाखांचा गंडा

नाशिक :  खाजगी प्रवाशी बस व्यावसायात गुंतवणूक केल्यास बस देण्याचे व नफ्यात दररोज दीड ते दोन लाख रुपये देण्याचे आमिष दाखवून उपनगर परिसरातील एका व्यक्तीची तब्बल पन्नास लाख  रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात पाच संशयितांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्नाटकातील संशयित आरोपी नवीन आचार्य याच्यासह इंदिरानगर येथील  मेघा कलकोट, समीर कलकोट, कल्पना पाटील ,श्रद्धा इंगोले यांनी उपनगरमधील  खोडे मळा परिसरातील  रमेश गवाल(  ७०)यांची सुमारे ५० लाख रुपयांची फसवणूक केली. रमेश गवाल यांचा टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय असून त्यांच्या ओळखीचे मेघा कलकोट, कल्पना पाटील, श्रद्धा इंगोल व त्यांच्यासोबत समीर कलकोट यांनी फियार्दी गवाल यांना  कर्नाटक येथील नवीन आचार्य यांच्याकडून ओळखीने दोन बस घेऊन देतो अशी बतावणी करून फोनवर बोलणे करून दिले. तसेच मेघा व समीर कलकोट यांनी दिनांक २६ एप्रिलला बोरिवली येथील एका हॉटेलमध्ये नवीन आचार्य याच्याशी मीटिंग करून दिली.यावेळी पन्नास लाख रुपयांच्या बदल्यात  दोन बस व त्यासोबतच करारपत्र पाठवून देतो. या बसेस बंगळुरू - मुंबई या मार्गावर चालून त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नापैकी दररोज दीड ते दोन लाख रुपये तुम्हाला पाठविण्याचे आमिष दाखवून विश्वास संपादन केला. त्यानंतर रमेश गवाल यांच्याकडून वेळोवेळी रोख व चेकद्वारे ५० लाख रुपये यांच्याकडून घेतले त्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी सात लाख रुपये फियार्दी यांच्या खात्यावर पाठवलेही. परंतु, त्यानंतर पैसे पाठविणे बंद केले. त्यामुळे गवाल यांनी कलकोट यांना सांगितले असता आचार्य हा लवकर तुमच्या दोन बसेस व पंचवीस लाख रुपये परत करणार आहे असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र त्यानंतरही  अद्यापपर्यंत पैसे परत मिळाले नसल्याने याप्रकरणी रमेश गवाल यांनी दिलेल्या फियार्दीनुसार इंदिरानगर पोलीस ठाण्यात संशयिताविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNashikनाशिकbusinessव्यवसायPoliceपोलिस