शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

सुताचे बंडल भासवून वाहून नेणारा १ कोटीचा अवैध मद्यसाठा हस्तगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2020 19:57 IST

नाशिक : बारा टायरच्या मालट्रक मध्ये कच्चे सुताचे बंडल असल्याचे भासवून कोट्यावधींचा दारूसाठा वाहतूक करणारा मालट्रक राज्य उत्पादन शुल्क ...

ठळक मुद्देएकास बेड्या ठोकण्यात आल्या सुवन अवतार सिंग या चालकाने पोबारा केलाविभागीय भरारी पथक तस्करांच्या मागावर

नाशिक : बारा टायरच्या मालट्रक मध्ये कच्चे सुताचे बंडल असल्याचे भासवून कोट्यावधींचा दारूसाठा वाहतूक करणारा मालट्रक राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या हाती लागला. या कारवाईत एकास बेड्या ठोकण्यात आल्या असून, त्याचे साथीदार पसार झाले आहे. संशयीताच्या ताब्यातून हरियाणा व अरूणाचल प्रदेश निर्मीत, राज्यात  बंदी असलेला १ कोटी ४ लाख ३३ हजार ७०० रूपये किमतीच्या मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या मद्यवाहतूकीमागे आंतरराष्ट्रीय टोळी असल्याचे बोलले जात असून, ही कारवाई वणी पिंपळगाव मार्गावरील जऊळके वणी शिवारात विभागीय भरारी पथकाने केली.सतीश शिविसंग (रा.खानपुरा - धौलपुर,राजस्थान) असे अटक केलेल्या संशयीताचे नाव आहे. मोठ्या प्रमाणात बेकायदा विदेशी मद्याची वाहतूक होणार असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. त्यानुसार विभागीय भरारी पथक तस्करांच्या मागावर असतांना वणी पिंपळगाव मार्गावरील जऊळके वणी शिवारात मद्याने भरलेला मालट्रक या विभागाच्या हाती लागला. ख कडून मिळालेल्या माहितीच्या आधारे विभागीय उपायुक्त अर्जुन ओहोळ,अधिक्षक मनोहर अंचुळे व निरीक्षक आर.एम.फुलझळके यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक देवदत्त पोटे,एस.एस.रावते,सी.एच.पाटील, जवान दिपक आव्हाड,लोकेश गायकवाड,विठ्ठल हाके,गोकुळ शिंदे व अमन तडवी आदींच्या पथकाने गोंडेगाव फाटा येथे सापळा लावला असता एमएच ४० बीएल ४५०८ या बारा चाकी मालट्रकमध्ये राज्यात बंदी असलेला हरियाणा व अरूणाचल प्रदेशात निर्मीत मद्यसाठा मिळून आला. मालट्रकमध्ये कच्चे सुताचे बंडल असल्याचे भासवून चोरकप्यातून ही चोरटी वाहतूक होत असल्याचे समोर आले आहे. पथकाची चाहूल लागताच सुवन अवतार सिंग या चालकाने पोबारा केला असून त्याचा साथीदार सतीश शिविसंग हा संशयीत पथकाच्या हाती लागला आहे. या वाहनातून मॅकडॉल,इम्परीयल ब्ल्यू,रॉयल चॅलेंज आदी विविध प्रकारचे सुमारे ९४५ विदेशी दारूचे बॉक्स वाहतूक होत असल्याचे पुढे आले. दरम्यान सुमारे १ कोटी ४ लाख ३३ हजार ७०० रूपये किमतीच्या मुद्देमालासह अटक केलेल्या संशयीतास पथक मुख्यालयात घेवून येत असतांना द्वारका भागात संशयीताने धुम ठोकण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात यश आले नाही. स्थानिकांच्या मदतीने त्यास पकडण्यात यश आले असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मद्यवाहतूकीत आंतरराराज्य टोळीचा समावेश असल्याचे बोलले जात असून त्यादृष्टीने पथक शोध घेत आहे. अधिक तपास दुय्यम निरीक्षक देवदत्त पोटे करीत आहेत.

टॅग्स :NashikनाशिकExcise Departmentउत्पादन शुल्क विभागArrestअटक