शहरं
Join us  
Trending Stories
1
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
2
Beed: अजित पवारांच्या ताफ्यासमोरच दोन तरुणांनी पेटवून घेण्याचा केला प्रयत्न, पोलिसांची धावपळ
3
६० मुस्लीम देशांच्या बैठकीत पाकिस्ताननं दिला 'इस्लामिक नाटो'चा प्रस्ताव; भारतासाठी किती चिंताजनक?
4
कॅनडातील वाणिज्य दूतावास ताब्यात घेणार; खलिस्तान समर्थकांची भारताला खुली धमकी...
5
२० वर्षांनंतर घेता येणार स्वेच्छा निवृत्ती, पण पूर्ण पेन्शनसाठी एवढ्या वर्षांची असणार अट
6
सरकारनं अदानींना दिली १ रूपये प्रतिवर्ष दराने १ हजार एकर जमीन; विरोधकांचा हल्लाबोल, प्रकरण काय?
7
PM Modi Birthday: पंतप्रधान मोदींचा डुप्लिकेट कोण? राजकीय सभांपासून बॉलिवूड सिनेमांमध्ये केलंय काम
8
Urban Company IPO Listing: ५६ टक्क्यांचं लिस्टिंग गेन, ₹१०३ च्या शेअरची धमाकेदार एन्ट्री; गुंतवणूकदार मालामाल
9
Nupur Bora : पैसाच पैसा! ५ वर्षांच्या सेवेत ९२ लाख, १ कोटीचे दागिने...; कोट्यवधींच्या कमाईने मुख्यमंत्रीही हैराण
10
"तुमच्या सक्षम मार्गदर्शनाखाली..."; शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना दिल्या खास शुभेच्छा
11
PM Modi Birthday: जिथे गेले तिथे गाजवलं वर्चस्व! जगातील 'या' मोठ्या देशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिला सर्वोच्च सन्मान 
12
Astro Tips: शुभ मुहूर्त पाहून मूल जन्माला घालणे शक्य आहे का? त्रेतायुगात सापडते उत्तर!
13
सगळे सलमानची बाजू घेत होते, ब्रेकअपनंतर ऐश्वर्याची इंडस्ट्रीनं सोडली साथ, दिग्दर्शकाचा खुलासा
14
सोने तारण कर्जाला सोन्याचे दिवस! जूनमध्ये झाली तब्बल १२२ टक्क्यांची वाढ
15
पैसे तयार ठेवा! कॅनरा रोबेको, हीरो मोटर्ससह या ६ कंपन्यांचे येणार IPO; सेबीकडून मिळाली मंजुरी, पाहा डिटेल्स
16
महाराष्ट्रात २ लाख रोजगार; ॲनिमेशन, गेमिंग धोरण जाहीर, ५० हजार कोटींची गुंतवणूक, ३,२६८ कोटींचा आराखडा
17
Electric Scooter: चार्जिंग सुरू असताना इलेक्ट्रिक स्कूटरला आग; नवरा- बायकोचा होरपळून मृत्यू!'
18
"नक्की कोण जिंकलं? आणि…’’, राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून शाह पिता-पुत्रावर टीकेचा बाऊन्सर 
19
मोबिक्विकला ४८ तासांत ४० कोटींचा फटका! लाखो युजर्सच्या खात्यातून पैशांची चोरी
20
Dashavatar: पाचव्या दिवशीही कोटींमध्ये कमाई, दिलीप प्रभावळकरांच्या सिनेमाने आत्तापर्यंत किती कमावले?

नाशकात आरटीईअंतर्गत १९८६ प्रवेश निश्चित ;दोन हजार ४६० विद्यार्थ्यांचे प्रवेश प्राथमिक टप्प्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 18:24 IST

नाशिक जिल्ह्यात आरटीईअंतर्गत आतापर्यंत केवळ एक हजार ९८६ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले असून, दोन हजार ४६० विद्यार्थ्यांचे प्राथमिक प्रवेश झाले असून, लॉटरीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांपैकी ८८१ विद्यार्थी अजूनही प्राथमिक टप्प्याती प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत.

ठळक मुद्दे आरटीईअंतर्गत एक हजार ९८६ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित दोन हजार ४६० विद्यार्थ्यांचे प्रवेश प्राथमिक टप्प्यात लॉटरीत निवड झालेले ८८१ विद्यार्थी अजूनही प्रतीक्षेत

नाशिक : कोरोनाच्या फैलावामुळे प्रभावित झालेली आरटीई प्रवेशप्रक्रिया तीन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर सुरू झाली असली तरी नाशिक जिल्ह्यात जुलैच्या अखेरपर्यंत प्रक्रियेतील पहिल्या टप्प्यात झालेल्या लॉटरीतील विद्यार्थ्यांचेच अद्याप १०० टक्के प्रवेश होऊ शकलेले नाही. आरटीईअंतर्गत आतापर्यंत केवळ एक हजार ९८६ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले असून, दोन हजार ४६० विद्यार्थ्यांचे प्राथमिक प्रवेश झाले असून, लॉटरीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांपैकी ८८१ विद्यार्थी अजूनही प्राथमिक टप्प्याती प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत.आरटीईअंतर्गत जिल्ह्यात सोमवारी सायंकाळपर्यंत सुमारे १९८६ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले असून, वेगवेगळ्या शाळांमध्ये २ हजार ४६० विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा प्राथमिक टप्पा पूर्ण झाला आहे. राज्यभरात आतापर्यंत सुमारे १५ हजार ७५८ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत, तर ४० हजार ११५ विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा प्राथमिक टप्पा पूर्ण झाला आहे. प्रवेशाचा प्राथमिक टप्पा पूर्ण केल्यानंतर संबंधित विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात येत आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांचे अंतिम प्रवेश निश्चित केले जात असल्याने यावर्षी आरटीई प्रवेशप्रक्रियेत एकच लॉटरी झालेली असतानाही प्रवेशप्रक्रिया लांबली आहे. दरम्यान, आरटीई प्रवेशप्रक्रियेत एकाच सोडतीद्वारे प्रवेशाची संधी मिळणार असून, उर्वरित जागांसाठी प्रतीक्षा यादीही सोडतीच्याच वेळी जाहीर करण्यात आली आहे. या सोडतीत निवड झालेल्या मुलांच्या प्रवेशासाठी पालकांना आवश्यक कागदपत्र पडताळणी समितीसमोर सादर करून प्रवेश निश्चित करावी लागणार आहे. त्यानंतर रिक्त राहणाºया जागांवर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे. परंतु अद्याप लॉटरीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांचीच प्रवेशप्रक्रिया पूर्ण होऊ शकलेली नाही. त्यामुळे प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना आणखी काहीकाळ वाट पाहावी लागणार असल्याचे दिसून येत आहे. निवडीसंदर्भात संकेतस्थळावर पडताळणी आवश्यक  आरटीई प्रवेशप्रक्रियेत यावर्षी ऑनलाइनपद्धतीने राज्यस्तरावरून एकच सोडत जाहीर करण्यात आली. या सोडतीद्वारे प्रवेशाची संधी मिळालेल्या व प्रतीक्षायादीत नाव असलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना एसएमएसद्वारे माहिती देण्यात आली आहे. परंतु, लॉटरीनंतर ज्या पालकांना अद्याप एसएमएस प्राप्त झालेला नाही, त्यांनी संकेतस्थळावरून पडताळणी करून घेणे आवश्यक असल्याची सूचना शिक्षण विभागाकडून करण्यात आलेली आहे. नाशिक जिल्ह्यात आरटीईअंतर्गत १९८६ प्रवेश निश्चित

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रNashikनाशिकSchoolशाळाStudentविद्यार्थीRight To Educationशिक्षण हक्क कायदा