२९ विद्यार्थी सैन्यदलात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 00:13 IST2020-02-25T22:51:08+5:302020-02-26T00:13:19+5:30

सैनिक हा देशाचा खरा सारथी असून, देशसेवा ही सर्वोत्तम सेवा आहे, असे प्रतिपादन प्राचार्य अशोक बागुल यांनी केले. बारागावपिंप्री येथील साने गुरु जी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित न्यू इंग्लिश स्कूल अ‍ॅण्ड ज्युनिअर कॉलेजमधील २९ विद्यार्थ्यांची एकाचवेळी सैन्यदलात निवड झाल्याबद्दल आयोजित सत्कार कार्यक्र मात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यामुळे शाळेचा अभिमान वाढला आहे.

19 students in the military | २९ विद्यार्थी सैन्यदलात

बारागावपिंप्री येथील इंग्लिश स्कूल अ‍ॅण्ड ज्युनिअर कॉलेजमधील विद्यार्थ्यांची सैन्यदलात निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी प्राचार्य अशोक बागुल, गणपत मुठाळ, प्रवीण जोशी आदींसह विद्यार्थी.

ठळक मुद्देबारागावपिंप्री : न्यू इंग्लिश स्कूलतर्फे गुणवंतांचा गौरव

सिन्नर : सैनिक हा देशाचा खरा सारथी असून, देशसेवा ही सर्वोत्तम सेवा आहे, असे प्रतिपादन प्राचार्य अशोक बागुल यांनी केले.
बारागावपिंप्री येथील साने गुरु जी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित न्यू इंग्लिश स्कूल अ‍ॅण्ड ज्युनिअर कॉलेजमधील २९ विद्यार्थ्यांची एकाचवेळी सैन्यदलात निवड झाल्याबद्दल आयोजित सत्कार कार्यक्र मात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यामुळे शाळेचा अभिमान वाढला आहे.
संस्थेचे अध्यक्ष गणपत मुठाळ, सचिव प्रवीण जोशी तसेच विश्वस्तांनी विद्यार्थ्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. उपप्राचार्य कल्पना रकिबे, ज्युनिअर कॉलेज इन्चार्ज भाऊराव गुंजाळ, पर्यवेक्षक दत्तात्रय पवार, शिक्षक अंबादास उगले, दत्तात्रय उगले, उत्तम उगले, विजय जाधव, वसंत जाधव, विनोद पानसरे आदींच्या हस्ते जवानांना विद्यालयाच्या वतीने सन्मान चिन्ह व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. सर्व विद्यार्थी ग्रामीण भागातील असून, त्यांच्या अंगी असलेल्या जिद्द, चिकाटी, मेहनत, आत्मविश्वास तसेच अभ्यास करण्याच्या प्रवृत्तीमुळे त्यांनी हे यश संपादन केले आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. विद्यार्थ्यांनी शालेय शिक्षण घेत असताना मिळालेल्या मार्गदर्शनाबाबत शिक्षकांप्रति ऋण व्यक्त केले. यावेळी शिक्षक, माजी विद्यार्थी उपस्थित होते.

सैन्यदलात भरती झालेले विद्यार्थी

भ्ााऊसाहेब गुंजाळ, विक्रम सानप, अनिल सानप, रवींद्र सानप, नितीन सानप, मयूर सानप, आदित्य सानप, शुभम सानप, अंकुश सानप, विशाल सानप, श्याम पानसरे, ऋषिकेश शेळके, विशाल जाधव, रोहित खांदोडे, विजय झनकर, आकाश उगले, अक्षय रोडे, अनिकेत गिते, प्रमोद उगले, अक्षय गोराडे, जयेश उगले, अंकुश पाटोळे, ऋषिकेश भापकर, भगवान सांगळे, रोशन सांगळे, सागर आघाव, आकाश ताडगे, गणेश झनकर, प्रमोद शिंदे.

Web Title: 19 students in the military

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.