शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

आदिवासी विकासमंत्र्यांसमवेत १८ला बैठक

By admin | Updated: June 14, 2014 01:54 IST

नाशिक : दोेन दिवसांपासून आदिवासी विकास आयुक्तालयासमोर आंदोलन करणाऱ्या लोकसंघर्ष समितीने गुरुवारी रात्री उशिरा लेखी आश्वासनानंतर आंदोलन तूर्त स्थगित करण्याचा निर्णय घेतला.

नाशिक : दोेन दिवसांपासून आदिवासी विकास आयुक्तालयासमोर आंदोलन करणाऱ्या लोकसंघर्ष समितीने गुरुवारी रात्री उशिरा लेखी आश्वासनानंतर आंदोलन तूर्त स्थगित करण्याचा निर्णय घेतला. येत्या १८ जूनला आदिवासी विकासमंत्री मधुकरराव पिचड यांच्या समवेत लोकसंघर्ष समितीची बैठक मुंबईत होणार असून, त्यात वनहक्क दावे व आश्रमशाळांतील भोजन या महत्त्वाच्या प्रश्नांवर धोरण ठरविण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.बुधवारी (दि. ११) आदिवासी बांधवांच्या विविध मागण्यांसाठी लोकसंघर्ष समितीच्या वतीने विभागीय महसूल आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढला. त्यानंतर हा मोर्चा आदिवासी विकास आयुक्तालयाच्या कार्यालयावर येऊन धडकला. सुरुवातीला आदिवासी आयुक्त व मोर्चेकरी यांच्यात समन्वय न झाल्याने मोर्चेकऱ्यांनी आदिवासी विकास आयुक्तालयासमोरच ठिय्या आंदोलन सुरू केले. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत त्यांचा मोर्चा सुरूच होता. गुरुवारी सकाळी ११ वाजेच्या दरम्यान आदिवासी विकास आयुक्त डॉ. संजीवकुमार यांनी लोकसंघर्षच्या नेत्या प्रतिभा शिंदे यांच्यासह श्याम पाटील, आनंद भालेराव, राजपालसिंह राणा, काथाभाऊ वसावे, रामदास वळवी, राजू देसले, धरमसिंग वाघेला, प्रदीप पावरा, बुधा दादा, नंदू वाघ आदिंच्या शिष्टमंडळाशी सायंकाळी उशिरापर्यंत चर्चा करून काही मागण्या मान्य केल्या; मात्र मोर्चेकऱ्यांनी आदिवासी विकासमंत्र्यांच्या लेखी आश्वासनाशिवाय आंदोलन स्थगित करण्यास नकार दिला. त्यामुळे रात्री नऊच्या सुमारास आदिवासी विकासमंत्री मधुकरराव पिचड यांनी लेखी दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. पिचड यांनी मोर्चेकऱ्यांना १८ जून रोजी मुंबईत बैठकीसाठी बोलावले आहे. तत्पूर्वी १७ जूनला नंदुरबार येथे विभागीय महसूल आयुक्त एकनाथ डवले यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारी रात्री आंदोलन स्थगित केल्यानंतर शुक्रवारी (दि. १३) बंद करण्यात आलेला गडकरी चौक ते त्र्यंबक नाकादरम्यानचा दुहेरी रस्ता पूर्ववत सुरू करण्यात आला.