१८ लाखांची फसवणूक; संशयितास पोलीस कोठडी
By Admin | Updated: August 2, 2014 01:24 IST2014-08-01T23:38:25+5:302014-08-02T01:24:13+5:30
१८ लाखांची फसवणूक; संशयितास पोलीस कोठडी

१८ लाखांची फसवणूक; संशयितास पोलीस कोठडी
वणी : कमी कालावधीत जास्त व्याजाचे आमिष दाखवून अठरा लाख रुपयांचा फसवणुकीचा आरोप असणाऱ्या संशयितास पकडण्यात वणी पोलिसांना यश आले असून, न्यायालयाने त्याला ६ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
दिंडोरी तालुक्यातील लखमापूर येथील तीस गुंतवणूकदारांची फसवणूक आस्था इंटरनॅशनल कंपनीने लखमापूर येथील संतोष बाळासाहेब सूर्यवंशी व सुरत येथील दिनेश वजीभाई पटेल या एजंटाच्या माध्यमातुन झाल्याची तक्रार वणी पोलिसात दाखल झाली होती. त्यास अनुसरून या दोन नमूद संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पैकी दिनेश पटेल याला अटक करण्यात आली होती. संतोष सूर्यवंशी ही घटना घडल्यापासून फरार होता सहायक पोलीस निरीक्षक शंकरराव बाबट यांनी सापळा रचून संतोषला अटक केली.(वार्ताहर)