निफाडच्या शिबिरात १७८ रुग्णांची नेत्रतपासणी
By Admin | Updated: June 27, 2014 00:19 IST2014-06-26T22:26:04+5:302014-06-27T00:19:48+5:30
निफाडच्या शिबिरात १७८ रुग्णांची नेत्रतपासणी

निफाडच्या शिबिरात १७८ रुग्णांची नेत्रतपासणी
पिंपळगाव बसवंत : महाराष्ट्र अॅन्ड गोवा बार कौन्सिलच्या पुढाकाराने व निफाड जिल्हा सत्र न्यायालय आणि तुलसी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने निफाड न्यायालय आवारात मोफत नेत्रतपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
जिल्हा सत्र न्यायालयाचे मुख्य न्या. ए. जे. मंत्री यांच्या हस्ते व महाराष्ट्र अँड गोवा बार कौन्सिलचे सदस्य अॅड. अविनाश भिडे यांच्या उपस्थितीत शिबिरास प्रारंभ झाला. दिवसभरात १७८ रुग्णांनी तपासणी करण्यात आली.
यात वकील, पक्षकार व नागरिकांचा समावेश होता. डॉ. प्रगती बोराडे, डॉ. राधारमण शौचे, डॉ. दीपक निकाळे आदिंनी रुग्णांना मार्गदर्शन केले. या ए. जे. मंत्री, न्या. एम. बी. गोसावी यांनी शिबिरास भेट दिली. यावेळी अॅड. बी. बी. बागडे,
अॅड. श्रीनिवास आंधळे, अॅड. पी. के. काळे, अॅड. आनंद कुलकर्णी, अॅड. विनोद गुंजाळ, अॅड. समीर भोसले, अॅड. एम. डी. व्यवहारे, अॅड. व्ही. एन. हाडपे, अॅड. आय. आर. रायते. अॅड. लयिक पटेल, सरकारी वकील
श्रीमती ज्योती निरगुडे आदिंसह वकीलसंघाचे सदस्य पक्षकार
व नागरिक उपस्थित
होते. (वार्ताहर)
चित्रकला स्पर्धेत प्रतीकचे यश
सिन्नर : येथील शेठ ब. ना. सारडा विद्यालयाचा विद्यार्थी प्रतीक संदीप जाधव याने राष्ट्रीय चित्रकला स्पर्धेत चतुर्थ क्रमांक पटकाविला
आहे.
नवनीत एज्युकेशनच्या वतीने राष्ट्रीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. प्रतीकने आठवी ते नववी गटातून राष्ट्रीय स्तरावर
चतुर्थ क्रमांक पटकाविला.
(वार्ताहर)