1778 टमरेल जप्त
By Admin | Updated: March 5, 2017 00:09 IST2017-03-05T00:08:39+5:302017-03-05T00:09:01+5:30
सिन्नर : तालुक्यातील ६३ गावांमध्ये गुडमॉर्निंग पथकाने एकाच वेळी धाड टाकत उघड्यावर प्रातर्विधीला जाणाऱ्यांकडून तब्बल एक हजार ७७८ टमरेल जप्त केले.

1778 टमरेल जप्त
सिन्नर : तालुक्यातील ६३ गावांमध्ये गुडमॉर्निंग पथकाने एकाच वेळी धाड टाकत उघड्यावर प्रातर्विधीला जाणाऱ्यांकडून तब्बल एक हजार ७७८ टमरेल जप्त केले. स्वच्छ भारत अभियानांतर्गत प्रत्येक गाव हगणदारीमुक्त करण्याच्या उद्देशाने पंचायत समितीने कठोर पाऊले उचलण्यास प्रारंभ केल्याने उघड्यावर प्रातर्विधीसाठी जाणाऱ्यांची दाणादाण उडाली आहे.
वैयक्तिक शौचालय बांधण्यासाठी वा शौचालयाचा वापर करावा यासाठी गुडमॉर्निंग पथकाकडून उघड्यावर शौचास जाणाऱ्यांचे गुलाबपुष्प देऊन प्रबोधन करण्यात येत होते. मात्र काहींवर त्याचा परिणाम झाला नसल्याचे पाहून पंचायत समितीचे गटविकास अधिकारी रत्नाकर पगार यांनी उघड्यावर शौचास जाणाऱ्यांचे टमरेल जप्त करण्याची मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला. शुक्रवारी रात्री तालुक्यात कार्यरत असलेले शिक्षक, आरोग्य कर्मचारी, अंगणवाडीसेविका, पशुसंवर्धन यांच्यासह जिल्हा परिषदेच्या सर्व कर्मचाऱ्यांना व्हॉट्सअॅपवर मेसेजद्वारे कळविण्यात येऊन पहाटे मोहिमेसाठी सज्ज राहण्याच्या सूचना करण्यात आल्या. उघड्यावर शौचाला जाणाऱ्या ६३ गावांची यादी बनविण्यात
आली. (वार्ताहर)