नाशिकरोड : दोन दिवसांपूर्वी मालधक्कारोड जियाउद्दिन डेपो येथून सीमेंटचे गुदाम फोडून चोरीस गेलेल्या १७३ सीमेंटच्या गोण्या पोलिसांनी जप्त केल्या असून, याप्रकरणी चौघा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.मालधक्कारोड जियाउद्दीन डेपो येथून मालधक्क्यावरील कार्टिंग एजंट यांच्या गुदाममधून ५५ हजार ३६० रुपये किमतीच्या १७३ सीमेंटच्या गोण्या चोरीस गेल्या होत्या. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकातील पोलीस कर्मचारी कय्युम मोहम्मद सय्यद व त्यांचे सहकारी तपास करत असताना त्यांना गुप्त माहितीद्वारे सीमेंट गोण्या चोरणाऱ्यांची माहिती मिळाली. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीलेश माईनकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक जगदीश शेलकर, मिलिंद पवार, किशोर खिल्लारे, मुदस्सर पठाण, महेश सावळे, निखिल वाकचौरे, विशाल पाटील, सोमनाथ जाधव यांनी सापळा रचून मुख्य सूत्रधार जमीर मोहम्मद शेख रा. मालधक्का रोड, गुलाबवाडी, नाशिकरोड यास ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्याने तीन सहकाऱ्यांच्या मदतीने सीमेंटच्या गोण्या चोरी केल्याची कबुली दिली.गोण्या वाहून नेणारा ट्रक जप्तसंशयित संदीप विजयकुमार रावत, दिलीपकुमार विजयकुमार रावत रा. जियाउद्दीन डेपो मूळ रा. उत्तर प्रदेश व ट्रकचालक राहिल शफीक शेख रा. मुल्लावाडा चांदवड या चौघांना ताब्यात घेऊन त्यांनी चोरलेल्या ५५ हजार रुपये किमतीच्या १७३ सीमेंटच्या गोण्या व सदर गोण्या वाहून नेण्यासाठी वापरण्यात आलेला पाच लाख रुपये किमतीचा ट्रक नाशिकरोड पोलिसांनी जप्त केला आहे.
१७३ सीमेंट गोण्या जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2019 00:14 IST
दोन दिवसांपूर्वी मालधक्कारोड जियाउद्दिन डेपो येथून सीमेंटचे गुदाम फोडून चोरीस गेलेल्या १७३ सीमेंटच्या गोण्या पोलिसांनी जप्त केल्या असून, याप्रकरणी चौघा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
१७३ सीमेंट गोण्या जप्त
ठळक मुद्देमालधक्का डेपो : दोन दिवसांपूर्वी चोरीची घटना