पंधरा जागांसाठी १७३ रिंगणात
By Admin | Updated: October 2, 2014 00:17 IST2014-10-01T23:28:55+5:302014-10-02T00:17:00+5:30
अपक्षांच्या उमेदवारीने बहुरंगी चित्र

पंधरा जागांसाठी १७३ रिंगणात
नाशिक : विधानसभा निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेण्याच्या अखेरच्या दिवशी नाराजांची मनधरणी व अपक्षांना माघार घेण्यासाठी राजी करण्याचे पुरेपूर प्रयत्न राजकीय पक्षांकडून व प्रतिस्पर्धी उमेदवारांकडून करण्यात आले. कोठे पुनर्वसन करण्याची हमी, तर कोठे ‘अर्थपूर्ण’ तडजोडी करून दुपारी तीन वाजेपर्यंत माघारीचे नाट्य घडले. काहींनी ‘होऊन जाऊ द्या एकदाचे’ असे म्हणत माघारीचा राजकीय दबाब झुगारून भूमिगत होण्याला प्राधान्य दिले, तर काहींची वेळेअभावी माघारी राहून गेली.
गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघांमध्ये माघारीसाठी अपक्षांचे व नाराजांचे मन वळविण्याचे प्रयत्न राजकीय पक्ष व त्यांच्या उमेदवारांकडून चालू होते.