येवला : तालुक्यातील १७ संशयितांचे कोरोना अहवाल बुधवारी (दि. २२) पॉझिटिव्ह आले, तर एका बाधिताचा मृत्यू झाला आहे. तालुक्यात आजपर्यंत २८१ बाधितांचा कोरोनाने बळी गेला आहे. तालुक्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या ५९६७ झाली असून, यापैकी ५५७९ बाधित कोरोनामुक्त झाले आहेत, तर सद्य:स्थितीत बाधित रुग्णसंख्या १०५ इतकी आहे.
येवल्यात १७ पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 01:03 IST