17 oxygen machines to the Satana Covid Center | सटाणा कोविड सेंटरला १७ ऑक्सिजन मशीन

सटाणा कोविड सेंटरला १७ ऑक्सिजन मशीन

स्थानिक निधी मधून पहिल्या टप्प्यात १० लाख रुपये किमतीचे स्वयंचलित ऑक्सिजन तयार करणारे १७ यंत्र सोमवारी (दि.१९) शहरातील नामपूर रस्त्यावरील कोविड केअर सेंटरला देण्यात आले. ही १७ यंत्रे ११ प्राथमिक आरोग्य केंद्रांना प्रत्येकी १ आणि तीन ग्रामीण रुग्णालयांना प्रत्येकी दोन देण्यात आली आहेत. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे रुग्णांच्या सोयीसाठी सध्या ते केअर सेंटर मध्ये ठेवण्यात येणार आहेत. याप्रसंगी आमदार बोरसे यांनी स्थानिक निधीच्या दुसर्‍या टप्प्यात आणखी ३१ ऑक्सिजन यंत्र देण्यात येणार असल्याची घोषणा केली. लोकार्पण कार्यक्रमास बागलाणचे प्रांत विजयकुमार भांगरे, तहसीलदार जितेंद्र इंगळे पाटील, गटविकास अधिकारी पांडुरंग कोल्हे, तालुका वैद्यकीय अधिकारी हेमंत अहिरराव, डॉ.सोनजे आदी उपस्थित होते.

फोटो- १९ सटाणा ऑक्सिजन

सटाणा कोविड सेंटरला १७ स्वयंचलित ऑक्सिजन यंत्र देताना आमदार दिलीप बोरसे. समवेत विजयकुमार भांगरे, जितेंद्र इंगळे, पांडुरंग कोल्हे, हेमंत अहिरराव आदी.

===Photopath===

190421\19nsk_38_19042021_13.jpg

===Caption===

फोटो- १९ सटाणा ऑक्सीजनसटाणा कोविड सेंटरला १७ स्वयंचलित ऑक्सीजन यंत्र देताना आमदार  दिलीप बोरसे. समवेत विजयकुमार भांगरे, जितेंद्र इंगळे, पांडुरंग कोल्हे, हेमंत अहिरराव आदी. 

Web Title: 17 oxygen machines to the Satana Covid Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.