१७ कोटींच्या विकासकामांना मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:21 IST2021-02-23T04:21:53+5:302021-02-23T04:21:53+5:30
स्थायी समिती सभापती राजाराम जाधव यांच्या अध्यक्षतेखाली व उपआयुक्त नितीन कापडणीस, राजेंद्र खैरनार यांच्या उपस्थितीत महापालिकेच्या सभागृहात स्थायी ...

१७ कोटींच्या विकासकामांना मंजुरी
स्थायी समिती सभापती राजाराम जाधव यांच्या अध्यक्षतेखाली व उपआयुक्त नितीन कापडणीस, राजेंद्र खैरनार यांच्या उपस्थितीत महापालिकेच्या सभागृहात स्थायी समितीची बैठक झाली. बैठकीत महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट असताना व मार्चअखेर जवळ येऊनही मोठ्या कामांना मंजुरी देण्यात आली. विशेष म्हणजे जुना आग्रारोडसाठी तब्बल ७ कोटी ९७ लाख २९ हजार ८५२ रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे. प्रस्तावित कामांमध्ये सात रस्ते दोन नाल्यांचे आरसीसी काँक्रिटीकरण कामास मंजुरी देण्यात आली आहे तसेच एकवीस वाहनांच्या खरेदीला मंजुरी दिली आहे. १ कोटी ७८ लाख व ६८ लाख रुपये खर्चातून दोन नाल्यांचे आरसीसी बांधकाम केले जाणार आहे. स्थायीच्या चर्चेत मुस्तकीम डिंगनिटी, मो सुलतान, नंदू सावंत,आशा आहिरे आदींसह सदस्यांनी सहभाग घेतला.
इन्फो
वाहन खरेदीसाठी समिती
जुन्या आग्रा रोडच्या निविदा मंजुरीच्या विषयाला मुस्तकीम डिग्नीटी यांनी आक्षेप घेतला तसेच २१ वाहने खरेदीचा विषय मंजूर करण्यात आला असला तरी या विषयाची अंमलबजावणी करण्यासाठी पाच सदस्यीय समिती गठीत करण्याचा निर्णय स्थायी समितीत घेण्यात आला. या समितीत सदस्यांची व अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. समितीच्या अध्यक्षपदी उपायुक्त नितीन कापडणीस हे राहणार आहेत.