कळवणच्या विकासकामांसाठी १७ कोटींचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:11 IST2021-06-21T04:11:28+5:302021-06-21T04:11:28+5:30
कळवण शहरातील विकासकामांसाठी आमदार नितीन पवार यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान, वैशिष्ट्यपूर्ण कामासाठीचा प्रस्ताव दाखल ...

कळवणच्या विकासकामांसाठी १७ कोटींचा निधी
कळवण शहरातील विकासकामांसाठी आमदार नितीन पवार यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान, वैशिष्ट्यपूर्ण कामासाठीचा प्रस्ताव दाखल करून निधीची मागणी केली होती. त्यानुसार सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेंतर्गत दहा कोटी रुपये, तर वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी विशेष अनुदान सात कोटी रुपये असा एकूण सतरा कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे.
शहरातील विविध विकासकामांमध्ये वाॅर्ड १- कब्रस्थान संरक्षक भिंत व रस्ता सुशोभीकरण (१ कोटी), शनी मंदिर ते सती माता मंदिर जॉगिंग ट्रॅक विकसित करणे (३ कोटी), अप्पा बुटे ते आठवडे बाजारपर्यंत पाईप गटार व रस्ता (२३ लाख), वाॅर्ड २- स्मशानभूमी संरक्षक भिंत बांधणे (७५ लाख), जंगम स्मशानभूमी संरक्षक भिंत व सुशोभीकरण (२० लाख) तसेच वाॅर्ड ३ - सांस्कृतिक भवन परिसरात पाईप गटार करणे (२४ लाख), वाॅर्ड ४ ॲड. धनंजय पाटील यांच्या घराजवळील ओपन स्पेस कंपाऊंड व सुशोभीकरण (३६ लाख), वाॅर्ड ५ - आधार हॉस्पिटल ते मधुकर दोधू पगार रस्ता काँक्रिटीकरण व भूमिगत गटार (७५ लाख), डॉ. सम्राट पवार हॉस्पिटल ते एमएसईबी पूल बांधकाम (१ कोटी), सिव्हील हॉस्पिटल ते आबा सूर्यवंशी घरापर्यंत (कुलस्वामिनी कॉलनी) रस्ता काँक्रिटीकरण (३९ लाख), रिलायन्स टॉवर (रेणुका कॉलनी) ते रामनगर रस्ता काँक्रिटीकरण (२२ लाख), आदींसह विविध विकासकामांचा समावेश आहे.
लवकरच या कामांना सुरुवात होणार असल्याची माहिती पगार यांनी दिली. यावेळी विषय समिती सभापती व नगरसेवक उपस्थित होते.