पदवीधरसाठी १७ उमेदवार रिंगणात
By Admin | Updated: January 21, 2017 00:25 IST2017-01-21T00:25:04+5:302017-01-21T00:25:22+5:30
पदवीधरसाठी १७ उमेदवार रिंगणात

पदवीधरसाठी १७ उमेदवार रिंगणात
नाशिकरोड : नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत शुक्रवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम मुदतीत ५ जणांनी आपले अर्ज मागे घेतल्याने १७ उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत. नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत २४ जणांनी ३९ उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यानंतर झालेल्या अर्जाच्या छाननीमध्ये विजय गायकवाड, अशोक पाटील या दोघांच्या अर्जासोबत अपुरी कागदपत्रे असल्याने त्यांचे उमेदवारी अर्ज अवैध ठरविण्यात आल्याने २२ जणांचे अर्ज वैध ठरले होते. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शुक्रवारी अंतिम दिवशी पुरुषोत्तम रकिबे, विठ्ठल गुंजाळ, सुरेश टाके, सुभाष डांगे, मनोज पवार या पाच जणांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे आता कॉँग्रेस आघाडीचे डॉ. सुधीर तांबे, भाजपाचे डॉ. प्रशांत पाटील, तिसऱ्या आघाडीचे कॉ. राजू देसले यांच्यासह आशिष बागुल, अॅड. सतीश इंगळे, महेश कडुस, विवेक ठाकरे, मंगेश ढगे, नितीन सरोदे, अॅड. सचिन पठारे, बाळासाहेब पवार, बापु रणधीर, बाळासाहेब लांडे, शरद तायडे, शंकर सोमवंशी, संजय सूर्यवंशी, संजय गांधी असे १७ उमेदवार रिंगणात असल्याची माहिती विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांनी दिली.