वणीत गोण्यांमधून १६५० क्विंटल आवक

By Admin | Updated: July 29, 2016 22:53 IST2016-07-29T22:46:51+5:302016-07-29T22:53:04+5:30

वणीत गोण्यांमधून १६५० क्विंटल आवक

1650 quintals of arrivals | वणीत गोण्यांमधून १६५० क्विंटल आवक

वणीत गोण्यांमधून १६५० क्विंटल आवक

वणी : वणीच्या उपबाजारात तीन हजार तीनशे गोण्यांमधून १६५० क्विंटल कांद्याची आवक झाली. ९७१ रु पये क्विंटल उच्चतम दराने कांद्याचे व्यवहार पार पाडण्यात आले. उपबाजारात आज दिंडोरी व कळवण तालुक्यातील ११० वाहनांमधून ५० किलोच्या गोण्यांमधून उत्पादकांनी कांदे विक्र ीसाठी आणले होते. कमाल ९७१ रुपये व किमान ६०० रुपये, तर सरासरी ८२५ रुपये क्विंटल दराने व्यापारी वर्गाने कांदा खरेदी केला. शेतकऱ्यांकडुन (कांदा विक्रे ते) कांदा खरेदी-विक्रीच्या व्यवहारप्रणालीत कोणतीही अडत कपात व्यापाऱ्यांनी केली नाही, अशी माहिती बाजार समिती सूत्रांनी दिली. कांदा खरेदी-विक्रीच्या व्यवहारप्रणालीत उत्पादक विक्रे ते व व्यापारी तसेच बाजार समिती यांच्या समन्वयात्मक पारदर्शी कार्यप्रणालीवर बाजार समितीचे लक्ष असल्याची माहिती सभापती दत्तात्रय पाटील यांनी दिली. (वार्ताहर)

Web Title: 1650 quintals of arrivals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.