१६३ कंत्राटी वैद्यकीय अधिकारी नियुक्त
By Admin | Updated: June 3, 2014 02:19 IST2014-06-02T23:43:53+5:302014-06-03T02:19:57+5:30
गटविकास अधिकार्यांना सीईओंच्या कडक सूचना

१६३ कंत्राटी वैद्यकीय अधिकारी नियुक्त
गटविकास अधिकार्यांना सीईओंच्या कडक सूचना
नाशिक : राज्यभर राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटनेने (मॅग्मोे) पुकारलेल्या संपामुळे आरोग्यसेवा विस्कळीत होऊ नये म्हणून १६३ कंत्राटी वैद्यकीय अधिकार्यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांनी दिली. या कंत्राटी वैद्यकीय अधिकार्यांनी कोणत्याही परिस्थितीत मुख्यालय न सोडता आरोग्यसेवा पुरविणे बंधनकारक करण्यात आले आहे.
राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत कंत्राटी वैद्यकीय अधिकार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यभरात महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी संप पुकारण्यात आला आहे. या संप काळात प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय येथील आरोग्यसेवा पुरविण्यासाठी नियमित सेवेच्या अथवा अस्थायी स्वरूपाच्या वैद्यकीय अधिकार्यांना संबंधित आरोग्य केंद्रात आरोग्यसेवा पुरविण्यासाठी मुख्यालयी थांबणे बंधनकारक करण्यात आले आहे. मॅग्मोमार्फत पुकारलेल्या असहकार आंदोलनात सहभागी असलेल्या वैद्यकीय अधिकार्यांनी संपात सहभाग नोंदविल्यास त्या ठिकाणी आरोग्यसेवा पुरविण्यासाठी या १६३ कंत्राटी वैद्यकीय अधिकार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कंत्राटी वैद्यकीय अधिकार्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालय येथील आरोग्यसेवा खंडित होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना गटविकास अधिकार्यांना मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी दिल्या आहेत. (प्रतिनिधी)