जिल्ह्यात १५७ कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:35 IST2021-02-05T05:35:18+5:302021-02-05T05:35:18+5:30
नाशिक : जिल्ह्यात रविवारी (दि.३१) एकूण १५७ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले असून, १४८ रुग्ण नव्याने कोरोनाबाधित झाले आहेत. ...

जिल्ह्यात १५७ कोरोनामुक्त
नाशिक : जिल्ह्यात रविवारी (दि.३१) एकूण १५७ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले असून, १४८ रुग्ण नव्याने कोरोनाबाधित झाले आहेत. दरम्यान, नाशिक मनपा क्षेत्रात दोघांचा मृत्यू झाला असल्याने आतापर्यंतच्या बळींची संख्या २०५१ वर पोहोचली आहे.
नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत बाधित झालेल्या रुग्णांची संख्या १ लाख १५ हजार ८१४ वर पोहोचली असून, त्यातील १ लाख १२ हजार ४४६ रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत, तर १३१७ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची सरासरी टक्केवारी ९७.०९ वर पोहोचली आहे. त्यात नाशिक शहरात ९७.७५, नाशिक ग्रामीण ९६.२६, मालेगाव शहरात ९३.०७, तर जिल्हाबाह्य ९४.८४ असे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आहे. जिल्ह्यात आतापर्यंत केलेल्या चाचण्यांची संख्या ४ लाख ९९ हजार ९० असून, त्यातील ३ लाख ८२ हजार ४१७ रुग्ण निगेटिव्ह, तर १ लाख १५ हजार ८१४ रुग्ण बाधित आढळून आले असून, ८५९ रुग्णांचे अहवाल प्रलंबित आहेत.