नाशकात आढळले १५३ कोरोनाबाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 12:02 AM2020-12-30T00:02:19+5:302020-12-30T00:13:07+5:30

नाशिक : शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरूच असून मंगळवारी (दि. २९) दिवसभरात शहरात ९७ तर ग्रामीणमध्ये ५२ असे जिल्ह्यात एकूण १५३ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तसेच एकूण ७ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तसेच २३५ रुग्ण मंगळवारी बरे झाले. सध्या जिल्ह्यात १ हजार ९७७ रुग्ण उपचारासाठी दाखल आहेत.

153 corona-infected found in Nashik | नाशकात आढळले १५३ कोरोनाबाधित

नाशकात आढळले १५३ कोरोनाबाधित

Next
ठळक मुद्दे७ रुग्णांचा मृत्यू : शहरात ९७ नवे रुग्ण, २३५ रुग्ण ठणठणीत बरे

नाशिक : शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरूच असून मंगळवारी (दि. २९) दिवसभरात शहरात ९७ तर ग्रामीणमध्ये ५२ असे जिल्ह्यात एकूण १५३ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तसेच एकूण ७ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तसेच २३५ रुग्ण मंगळवारी बरे झाले. सध्या जिल्ह्यात १ हजार ९७७ रुग्ण उपचारासाठी दाखल आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात जरी असला तरी शहरासह जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्ण आढळून येण्याचे अद्याप थांबलेले नाही. यामुळे नागरिकांनी खबरदारी घेणेदेखील तितकेच गरजेचे आहे. आगामी थर्टीफर्स्टच्या निमित्ताने सार्वजनिक ठिकाणी एकत्र येत आनंदोत्सव साजरा करण्याला नागरिकांनी यंदा फाटा देण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. कोरोनाचा नायनाट करण्यासाठी सार्वजनिकरित्या होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे आहे.
मंगळवारी दिवसभरात संपूर्ण जिल्ह्यात १५३ रुग्ण आढळून आले. यामुळे जिल्ह्याची आतापर्यंतची रुग्णसंख्या १ लाख ९ हजार ४८८ वर पोहचली आहे. त्यापैकी १ लाख ५५ हजार ४९ रुग्णांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे. तसेच जिल्ह्यात एकूण १ हजार ९६२ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. रुग्ण बरे होण्याचा दर जिल्ह्यात सुमारे ९६.४० टक्के असून ही नाशिककरांना दिलासा देणारी बाब आहे. आतापर्यंत झालेल्या तपासणीतून ३ लाख १५ हजार १५१ नागरिक निगेटिव्ह आले आहेत. एकूण ३ हजार २४० अहवाल अद्याप प्रलंबित आहे. नाशिक महापालिका क्षेत्रातून मंगळवारी १ हजार १९१ संशयित रुग्ण उपचारासाठी दाखल झाले. सध्या शहरात १ हजार २६८ कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहे. कोरोनाबाधित येण्याचा दर २५.५९ टक्के असल्याची माहिती जिल्हा रुग्णालयाच्या सूत्रांनी दिली.

Web Title: 153 corona-infected found in Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.