शहरं
Join us  
Trending Stories
1
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
2
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
3
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
4
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
5
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
6
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे
7
Health Tips: उन्हाळ्यात प्रकृती थंड ठेवण्यासाठी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकरांनी सांगितला SST फॉर्म्युला!
8
मनसे नेते अमित ठाकरेंचं शालेय शिक्षणमंत्र्यांना पत्र; RTE प्रवेश प्रक्रियेवरून नाराजी
9
'देशात काँग्रेस संपत असताना पाकिस्तानला रडू येतंय'; व्होट जिहादवरुन मोदींचा निशाणा
10
कोव्हिशील्ड घेतलेल्यांना सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची राहूनच गेली! रवी गोडसेंनी सांगितला पुढचा 'धोका...'
11
Guru Asta 2024: गुरु अस्त काळात होणार राजकीय उलथापालथ? मंगल कार्य वर्ज्य? वाचा उपाययोजना!
12
Gold Price Today: सोन्याच्या किंमतीत झाली मोठी घसरण, ७५००० च्या उच्चांकावरून ७१००० रुपयांवर आलं गोल्ड
13
Goldy Brar Murder : गोल्डी ब्रारच्या हत्येची बातमी अफवा; अमेरिकन पोलिसांनी केले स्पष्ट
14
कोकणात दादा आणि भाईंचं मनोमीलन कसं झालं? खुद्द केसरकर यांनीच सांगितली 'इनसाईड स्टोरी'   
15
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती
16
Uma Bharti : "काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी देशाचे विभाजन केले"; उमा भारतींची राहुल-सोनिया गांधींवर टीका
17
अहो आश्चर्यम्! मारुतीच्या नव्या स्विफ्टला मिळाली ४ स्टार सेफ्टी रेटिंग; जपानमध्ये क्रॅश टेस्ट
18
Multibagger Stock : सलग तिसऱ्या दिवशी 'या' कंपनीच्या शेअरला अपर सर्किट; वर्षभरापासून करतोय मालामाल
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण अपक्ष निवडणूक लढवणार
20
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर

घरकुलाच्या हप्त्यातून  पीक कर्जात १५ हजार वर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 12:19 AM

तालुक्यातील नांदुरी येथील कॅनरा बँकेच्या शाखाधिकाऱ्याने पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरकुल लाभार्थींच्या पहिल्या व दुसरा हप्त्याच्या आलेल्या निधीतून २५ हजार रुपये पीक कर्ज खात्यात वर्ग करून घेतल्याने आदिवासी लाभार्थींचे घरकुलाचे काम रखडले आहे. काम पूर्ण करण्यासाठी पैसे नसल्याने आदिवासी लाभार्थींचे घरकुलाचे स्वप्न आता दिवास्वप्न ठरू पाहत आहे.

कळवण : तालुक्यातील नांदुरी येथील कॅनरा बँकेच्या शाखाधिकाऱ्याने पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरकुल लाभार्थींच्या पहिल्या व दुसरा हप्त्याच्या आलेल्या निधीतून २५ हजार रुपये पीक कर्ज खात्यात वर्ग करून घेतल्याने आदिवासी लाभार्थींचे घरकुलाचे काम रखडले आहे.काम पूर्ण करण्यासाठी पैसे नसल्याने आदिवासी लाभार्थींचे घरकुलाचे स्वप्न आता दिवास्वप्न ठरू पाहत आहे. घरकुलाचे उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी आलेल्या निधीतील १५ हजार रु पयांचा निधी कॅनरा बँकेने तत्काळ खात्यात वर्ग करावा, अशी मागणी घरकुल लाभार्थी सुखला सुरेश गवळी यांच्यासह अन्य लाभार्थींनी केली आहे. या प्रकरणी लाभार्थींनी पंचायत समिती प्रशासनाचे लक्ष वेधून घेत कॅनरा बॅँकेविरोधात तक्रार नोंदविली आहे.  प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थींच्या घरकुलाच्या कामासाठी अनुदान स्वरु पात आलेला निधी पीक कर्ज खात्यात जमा केल्याने खात्यात पैसाच शिल्लक नसल्याने त्यांच्या घराचे काम रखडले आहे. घरकुलाचे काम सुरू झाल्याने आदिवासी लाभार्थींनी त्यांचे जुने कुडाचे झोपडेवजा घरे पाडली. आज संसार उघड्यावर आला आहे. उर्वरित घरकुलाचे काम पूर्ण करण्यासाठी हक्काचा निधी मिळविण्यासाठी बेघर झालेल्या आदिवासी लाभार्थींवर पंचायत समिती व कॅनरा बँकेचे उंबरठे झिजवण्याची वेळ आली आहे. घरकुलाचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यासाठी कॅनरा बँकेतील खात्यावर जमा झालेला निधी पीक कर्ज खात्यात जमा न करता तत्काळ अदा करावा, अशी मागणी लाभार्थी सुखला गवळी, सुभाष रघुनाथ भोये, धनराज कारभारी कुवर यांनी गटविकास अधिकारी बहिरम यांच्याकडे केली आहे. या योजनेचा निधी बॅँकेला अथवा लाभार्थीला दुसºया कामासाठी वापरता येणार नाही. पंचायत समिती स्तरावरून बँकेच्या शाखाधिकायांशी भ्रमणध्वनीवरून संपर्कसाधण्याचा प्रयत्न केला. मात्र संपर्कहोऊ शकला नाही. बँकेशी पत्रव्यवहार करून घरकुलाचा निधी तत्काळ लाभार्थींना उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करू.- डी. एम. बहिरम, गटविकास अधिकारी, कळवण

टॅग्स :bankबँक