पन्नाशी ओलांडलेल्यांचा १५०० किमी पायी प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2019 19:34 IST2019-01-29T19:33:49+5:302019-01-29T19:34:11+5:30

मनोरी : मानोरी : जीवनामध्ये प्रत्येक माणूस देवदेवतांच्या दर्शनासाठी तसेच जीवनात सुख, शांती मिळवण्यासाठी अनेक प्रकारचे देवाला साकडे घालत असतात. आणि हेच देवाला घातलेले साकडे जर पूर्ण झाले तर त्याची परतफेड करण्यासाठी माणूस अनेक प्रकारचे पर्याय वापरत असतो.

1500 km journey by fifty people crossing | पन्नाशी ओलांडलेल्यांचा १५०० किमी पायी प्रवास

मानोरीचे ग्रामस्थ नर्मदा परिक्र मा करताना मध्यप्रदेश राज्यात नदीकाठी दर्शन घेताना नामदेव शेळके, दत्रात्रय चिने, सुकदेव रोकडे, मनोहर जाधव.

ठळक मुद्देनर्मदा परिक्र मा : मानोरीच्या चार ग्रामस्थाची नर्मदा फेरी

मनोरी : मानोरी : जीवनामध्ये प्रत्येक माणूस देवदेवतांच्या दर्शनासाठी तसेच जीवनात सुख, शांती मिळवण्यासाठी अनेक प्रकारचे देवाला साकडे घालत असतात. आणि हेच देवाला घातलेले साकडे जर पूर्ण झाले तर त्याची परतफेड करण्यासाठी माणूस अनेक प्रकारचे पर्याय वापरत असतो.
येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक येथील रहिवासी सुकदेव रोकडे (६०), नामदेव शेळके (७०), दत्तात्रय चिने (६५) आणि मनोहर जाधव (५८) हे चार ग्रामस्थ १४ नोव्हेबरला मानोरी येथून नर्मदा परिक्र मासाठी पाई निघालेले असून अडीच महिन्यानंतर म्हणजेच २८ जानेवारीला मध्यप्रदेश राज्यातील बांद्रा येथे पोहचले असून या चार ग्रामस्थाचा प्रवास सुमारे १५०० किलोमीटर पाई चालत गेल्याचे वृत्त त्यांनी दुरध्वनीवरून मानोरीच्या ग्रामस्थांना दिले. यापुढेही अजून दोन महिने पायी प्रवास करावयाचा असून या दोन महिन्यात १००० किलोमीटर अंतर पायी पार करायचे असल्याने हि त्यांनी सांगितले.
नर्मदा परिक्र मा पूर्णकरण्यासाठी हे चार ग्रामस्थ दररोज २० ते २५ किलोमीटर अंतर पायी चालत आहे. तसेच दिवसेदिवस वातावरणात बदल होत असल्याने त्याचा परिणाम हि शरीरावर थोडाफार जाणवत असल्याची माहिती नर्मदा परिक्र मा करण्याऱ्या व्यक्तींनी दिली आहे.
तसेच हि परिक्र मा पूर्ण करताना अतिशय अडथळे निर्माण होत असून कधी रिमझिम पाउस तर कधी कडाक्याच्या पडणाºया थंडीचा विचार न करता हा पायी प्रवास सुरु आहे. विशेष बाब म्हणजे हि नर्मदा पूर्ण केल्याशिवाय कटिंग, दाढी, नखे न काढता हा प्रवास पूर्ण करावा लागतो. या चार ग्रामस्थांची नर्मदा परिक्र मापूर्ण झाल्यानतर विशेष कार्यक्र माचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.
प्रतिक्रि या - आम्ही पूर्ण निश्चय करून हि नर्मदा परिक्र मा पूर्ण करण्यासाठी घरातून बाहेर पडलो असून जीवनात येवढे पायी चालणे म्हणजे आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. अडीच महिन्यापासून घर सोडले असून अजून साधारणपणे तीन महिन्यानतर आम्ही मानोरीत परतणार आहे.
-------- नामदेव शेळके, दत्तात्रय चिने, सुकदेव रोकडे, नर्मदा परिक्र मा करणारे ग्रामस्थ.
मिळालेल्या माहितीनुसार नर्मदा परिक्र मा थोडक्यात माहिती.
नर्मदा परिक्र मा हि मोठी प्रदक्षिणा आहे.शनर्मदेच्या काठाकाठाने केलेली गोल प्रदक्षिणा म्हणजे नर्मदा परिक्र मा असून हि संपूर्ण फेरी ४००० किलोमीटर अंतर करून नर्मदा परिक्र मा घडते अशी माहिती यावेळी जाणकाराकडून मिळते.
 

Web Title: 1500 km journey by fifty people crossing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.