१५ हजार ७७३ उमेदवारांनी दिली एमपीएससी परीक्षा
By Admin | Updated: July 17, 2017 00:35 IST2017-07-17T00:35:28+5:302017-07-17T00:35:41+5:30
नाशिक : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे रविवारी (दि.१६) घेण्यात आलेली विक्रीकर निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक आणि सहायकपदासाठी सुमारे १५ हजार ७७३ उमेदवारांनी एमपीएससीची पूर्व परीक्षा दिली,

१५ हजार ७७३ उमेदवारांनी दिली एमपीएससी परीक्षा
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे रविवारी (दि.१६) घेण्यात आलेली विक्रीकर निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक आणि सहायक
पदासाठी सुमारे १५ हजार ७७३ उमेदवारांनी एमपीएससीची पूर्व परीक्षा दिली, तर या परीक्षेला परीक्षेला सुमारे ३ हजार ४७६ उमेदवारांनी दांडी मारली. नाशिकमधील एकूण ४८ केंद्रांवर घेण्यात आलेल्या या परीक्षेसाठी प्रशासनाने सुमारे ११०० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेसाठी जिल्हाभरातून सुमारे १९ हजार २४९ उमेदवार प्रविष्ट झाले होते. त्यापैकी १५ हजार ७७३ उमेदवारांनी शहरातील विविध ४८ केंद्रांवर परीक्षा दिली, तर ३ हजार ४७६ उमेदवारांनी या परीक्षेला दांडी मारली. जिल्हा प्रशासनाने परीक्षा व्यवस्थापनासाठी ११०० कर्मचाऱ्यांची नेमणूक करून परीक्षा घेतली. किरकोळ अपवाद वगळता सर्व परीक्षा केंद्रांवर परीक्षा शांततेत पार पडली. दरम्यान, या परीक्षेच्या माध्यमातून विक्रीकर निरीक्षक पदासाठी परीक्षा देणाऱ्या उमेदवारांच्या पदांमध्ये आयोगाकडून पदांमध्ये होणाऱ्या फेरबदलांचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.