मोबाइल दुकानातून १५ लाखांच्या मोबाइलची चोरी
By Admin | Updated: February 17, 2017 22:09 IST2017-02-17T22:09:42+5:302017-02-17T22:09:42+5:30
गंगापूररोडवरील सॅमसंग मोबाइल शॉपीचे शटर उचकटून चोरट्यांनी १५ लाख रुपयांचे मोबाइल

मोबाइल दुकानातून १५ लाखांच्या मोबाइलची चोरी
नाशिक : गंगापूररोडवरील सॅमसंग मोबाइल शॉपीचे शटर उचकटून चोरट्यांनी १५ लाख रुपयांचे मोबाइल चोरून नेल्याची घटना शुक्रवारी (दि़१७) पहाटेच्या सुमारास घडली़ विशेष म्हणजे चोरट्यांचा हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे़ या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत़
गंगापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रसाद सर्कलजवळील संगम स्वीटच्या समोर गिरणारे येथील सागर लोखंडे यांचे सॅमसंग मोबाइल दुकान आहे़ पहाटे सव्वापाच वाजेच्या सुमारास या दुकानाचे शटर उचकटून सात चोरट्यांनी दुकानात प्रवेश करून १५ लाख रुपये किमतीचे महागडे मोबाइल चोरून नेले़ चोरट्यांचा हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे़ यातील एकाने सीसीटीव्ही कॅमेऱ्यासमोर चादरीचा आडोसा करण्याचा प्रयत्न दिसून येतो आहे़
शुक्रवारी पहाटे सव्वापाच ते साडेसहा वाजेपर्यंत चोरट्यांचा मोबाइल दुकानात धिंगाणा सुरू होता़ या चोरीची सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यानुसार त्यांचा शोध घेतला जातो आहे़