शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
2
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
4
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
5
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
6
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
7
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
8
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
9
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
10
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
11
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
12
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
13
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
14
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
15
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
16
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
17
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
18
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
19
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
20
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

शेतकऱ्यांचे १५ लाख थकवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 12:24 AM

येवला : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अंदरसूल उपबाजार आवारात शेतकºयांनी विक्र ी केलेल्या कांद्याचे पेमेंट राजेंद्र नागनाथ धुमाळ या कांदा व्यापाºयाने धनादेशाद्वारे शेतकºयांना अदा केलेले असताना सुमारे ५० शेतकºयांचे धनादेश न वटल्याने शेतकºयांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक झाल्याने शेतकरी संतप्त झाले आहे. कष्टाचे पैसे मिळवण्यासाठी शुक्रवार २० एप्रिलपासून सहायक निबंधक कार्यालयासमोर अमरण उपोषणास बसणार आहेत.

ठळक मुद्देशेतकºयांमध्ये खळबळबाजार समितीने व्यापाºयांना नोटिसा दिल्या

येवला : कांदा उत्पादकांचा संताप, शुक्र वारपासून आमरण उपोषण 

येवला : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अंदरसूल उपबाजार आवारात शेतकºयांनी विक्र ी केलेल्या कांद्याचे पेमेंट राजेंद्र नागनाथ धुमाळ या कांदा व्यापाºयाने धनादेशाद्वारे शेतकºयांना अदा केलेले असताना सुमारे ५० शेतकºयांचे धनादेश न वटल्याने शेतकºयांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक झाल्याने शेतकरी संतप्त झाले आहे. कष्टाचे पैसे मिळवण्यासाठी शुक्रवार २० एप्रिलपासून सहायक निबंधक कार्यालयासमोर अमरण उपोषणास बसणार आहेत.कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अंदरसूल उपबाजार आवारातील या कांदा व्यापाºयाकडे फेब्रुवारी महिन्यात अंदरसूल परिसरातील शेतकºयांनी कांदा विक्री केला होता. या व्यापाºयाने मालाचे पैसे रोख न देता ५० शेतकºयांना धनादेशाद्वारे पेमेंट अदा केले होते. मार्च महिना अखेर सबंधित शेतकºयांचे धनादेश न वटल्यामुळे त्यांनी कांदा व्यापाºयाकडे धाव घेतल्यानंतर व्यापाºयाने भेट टाळणे, अरेरावीची भाषा करणे, दबाव आणणे असे वर्तन केल्याची तक्रार शेतकººयांनी केली आहे. हा प्रकार बाजार समितीच्या पदाधिकाºयांच्या निदर्शनास आणून दिला. या प्रश्नावर शेतकºयांनी उपोषणाचे हत्यार उपासले आहे. सहायक निबंधक एकनाथ पाटील यांनी बाजार समितीस १३ रोजी पत्र लिहून हा विषय गांभीर्याने घेण्याचे कळविले होते. तसेच १७ पर्यंत सर्व शेतकºयांचे पैसे द्यावेत. त्यासाठी तत्काळ कार्यवाही करावी, अशा सूचना दिल्या आहेत. पैसे मिळावेत म्हणून शेतकºयांनी शुक्रवार २० एप्रिलपासून आमरण उपोषणास बसण्याचा निर्णय घेतला आहे. उपोषणास संपत आहेर, भास्कर कदम, कैलास चव्हाण, दत्तात्रय चव्हाण, पोपट बोरसे, सखाहरी जाधव, सखाहरी दाभाडे, नामदेव कदम, दिनकर भंडारी, साहेबराव संत्रे, जगन्नाथ एंडाईत आदीसह शेतकरी बसणार आहे.सूर्यभान माधवराव गायकवाड या शेतकºयाला दिलेला धनादेश माघारी आला आहे. त्यांनी बाजार समितीसह प्रशासनाकडे तक्रार केली आहे.शेतकºयांमध्ये खळबळअंदरसूल, नगरसूल, तळवाडे, पांजरवाडी, धामणगाव, पाराळा, गारखेडा, देशमाने, उंदीरवाडी, ममदापूर, गवंडगाव, बोकटे, देवठाण, कोळम, पढेगाव, निमगाव मढ, दुगलगाव, अंगुलगाव आदी गावांमधील कांदा उत्पादक शेतकºयांचे सुमारे १५ लाख रु पयांचे धनादेश वटलेले नाही. यामुळे खळबळ निर्माण झाली आहे. बाजार समितीने व्यापाºयांना नोटिसा दिल्या आहेत. पैसे थकवल्यामुळे त्या दोन व्यापाºयांचा परवानादेखील रद्द केला आहे. शिवाय येवला सहायक निबंधक, जिल्हा सहकारी निबंधक यांनी याबाबत विचारणा केली आहे. बाजार समिती आता शेतकºयांचे पेमेंट रोखीने देत आहे. रोख पेमेंट सुरु झाल्यामुळे आता पैसे थकवण्याचा प्रश्न भविष्यात निर्माण होणार नाही. सुमारे ५५० कोटी रु पये रक्कम कांदा उत्पादक शेतकºयांना रोख देण्यात आले आहे. सुमारे अर्धा टक्का रक्कम थकली हे मान्य आहे. ३० एप्रिलपर्यंत पेमेंट देण्याचे त्या दोन व्यापाºयांनी कबूल केले आहे.उषाताई शिंदे, सभापती, येवला कृषी उत्पन्न बाजार समितीबाजार समिती शेतमाल विक्र ीवर कमिशन घेते. त्यामुळे पैसे देण्याची जबाबदारी बाजार समितीची आहे. परवानाधारक व्यापाºयाकडून बँक सॉलव्हन्सी, सातबारा उताºयावर बाजार समितीचे नाव लावून घेण्याची जिल्ह्यातील अन्य सात बाजार समितीमधील पद्धत येवला बाजार समितीने अवलंबावी.दीपक पाटोदकर,सामाजिक कार्यकर्ता