शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

वसाकात सात ट्रकसह १५ ड्रायव्हर, क्लिनर अडकले, वाहतूकदारांचा प्रशासनावर निष्क्रीयतेचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2019 17:36 IST

वसंतदादा साखर कारखान्यातील कर्मचाऱ्यानी थकीत पगार, कामगार करार व इतर मागण्यांसाठी २२ जानेवारीपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. मात्र, कारखाना भाडेतत्त्वावर घेतलेल्या धाराशीव कारखान्याचे अध्यक्ष व प्रशासकीय मंडळाने अद्याप या आंदोलनाची दखल घेतलेली नाही. त्यामुळे कामगारांनी थकित वेतनाच्या मुद्द्यावर तातडीने तोडगा काढण्याची मागणी करीत कारखान्यातून साखर उचलण्यासाठी आलेले राज्यस्थानचे ७ ट्रकसह १५ ड्रायव्हर व क्लिनर यांना बंधीस्थ केल्याचा आरोप नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे माजी अध्यक्ष अंजू सिंघल व दिलीप सिंह बेनीवाल यांनी रविवारी (दि.१०) पत्रकार परिषदेत केला आहे. 

ठळक मुद्देवसाकामध्ये अडकले राज्यस्थानचे सात ट्रक ट्रकसोबत ड्रायव्हर क्लिनरही कारखान्यात अडकून कामगारांच्या आंदोलनामुळे वाहतूकदारांसमोर पेच

नाशिक : वसंतदादा साखर कारखान्यातील कर्मचाऱ्यानी थकीत पगार, कामगार करार व इतर मागण्यांसाठी २२ जानेवारीपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. मात्र, कारखाना भाडेतत्त्वावर घेतलेल्या धाराशीव कारखान्याचे अध्यक्ष व प्रशासकीय मंडळाने अद्याप या आंदोलनाची दखल घेतलेली नाही. त्यामुळे कामगारांनी थकित वेतनाच्या मुद्द्यावर तातडीने तोडगा काढण्याची मागणी करीत कारखान्यातून साखर उचलण्यासाठी आलेले राज्यस्थानचे ७ ट्रकसह १५ ड्रायव्हर व क्लिनर यांना बंधीस्थ केल्याचा आरोप नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे माजी अध्यक्ष अंजू सिंघल व दिलीप सिंह बेनीवाल यांनी रविवारी (दि. १०) पत्रकार परिषदेत केला आहे. थकीत पगार, कामगार करार व इतर मागण्यांसाठी २२ जानेवारीपासून वसंतदादा सहकारी साखर कारखान्यातील कर्मचाºयांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे; परंतु कारखाना प्रशासनाकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने कर्मचाºयांचे आंदोलन कायम आहे. जोपर्यंत मागण्यांवर चर्चा होत नाही, तोपर्यंत साखर व मळी कारखान्याबाहेर जाऊ देणार नाही, असा इशारा कामगारांनी दिला आहे. त्यामुळे कारखान्यात २० जानेवारीला साखर उचलण्यासाठी आलेले राजस्थानचे ७ ट्रक ड्रायव्हर व क्लिनरसह कारखान्यात अडकून पडले आहे. हे ट्रक श्रीनाथ ट्रान्सपोर्ट कंपनीचे असून कंपनीने ट्रक व कामगारांना सोडविण्यासाठी  देवळा पोलीस फिर्याद दाखल करून मदत मागितली. परंतु, स्थानिक पोलिसांकडून कोणतीही मदत मिळत नसल्याने कंपनीने नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएनच्या सहकार्याने उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर व जिल्हा पोलीस अधीक्षक संजय देवरे यांनाही याप्रकरणी निवेदन देऊन मदतीची मागणी केली. परंतु,प्रशासानाकडून कोणतीही मदत मिळत नसल्याचा आरोप वाहतूक दारांनी के सा आहे. यावेळी ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे नाशिक  गुड्स ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे उपाध्यक्ष शक्तीसिंह राज पुरोहीत, नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे सल्लागार प्रदीपसिंह चौधरी, हनुमान बेनीवाल, नाशिक जाट समाजाचे अध्यक्ष ईश्वर जाट, नरसिंह चौधरी, खेताराम चौधरी आदी उपस्थित होते. 

ट्रक, कामगारांना सोडावेगेल्या २० ते २१ दिवसांपासून ट्रकसोबत ड्रायव्हर आणि क्लिनरही कारखान्यात अडकून पडले आहेत. यातील सात ट्रकमध्ये सुमारे २०० टनाहून अधिक माल भरलेला असून ट्रक एका जागेवर उभे आहे. त्यामुळे टायरचे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे किमान ट्रकमधून साखर खाली करून रिकामे ट्रक आणि कामगारांना तरी सोडण्यात अशी मागणी ट्रक मालकांनी केली आहे. 

टॅग्स :agitationआंदोलनNashikनाशिकSugar factoryसाखर कारखाने