आधार जोडणीला १५ दिवसांची मुदतवाढ

By Admin | Updated: April 8, 2016 00:43 IST2016-04-08T00:10:16+5:302016-04-08T00:43:03+5:30

आधार जोडणीला १५ दिवसांची मुदतवाढ

15 days extension to support connection | आधार जोडणीला १५ दिवसांची मुदतवाढ

आधार जोडणीला १५ दिवसांची मुदतवाढ


नाशिक : पात्र शिधापत्रिकाधारकांचे आधार क्रमांक गोळा करण्याच्या कामास राज्य सरकारच्या वतीने पंधरा दिवसांची मुदतवाढ देण्यात आली असून, तशा सूचना रेशन दुकानदारांना देण्यात आल्या आहेत.
गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या या मोहिमेंतर्गत जिल्ह्यात ६५ टक्के शिधापत्रिकाधारकांचेच आधार क्रमांक जमा होऊ शकले आहेत. राज्य सरकारने ३१ मार्च अखेरपर्यंत आधार गोळा करण्याची मुदत दिली होती; परंतु प्रारंभी रेशन दुकानदारांनी त्यास विरोध दर्शविल्यानंतर या कामाला खीळ बसली. दरम्यान, तलाठ्यांकरवी शिधापत्रिकाधारकांचे आधार गोळा करण्याचे ठरविल्यानंतर रेशन दुकानदारांनी त्यास सहमती दर्शविली. जिल्ह्यात ६५ टक्के शिधापत्रिका-धारकांचे आधार क्रमांक गोळा करण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: 15 days extension to support connection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.