चांदगिरीत सापडले १५ बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:19 IST2021-04-30T04:19:22+5:302021-04-30T04:19:22+5:30

शिंदे प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र जाखोरी यांच्या मदतीने चांदगिरी गावात रॅपिड अँटिजेन टेस्ट शिबीर घेण्यात आले. लॅब टेक्निशियन सार्थक ...

15 affected in Chandgiri | चांदगिरीत सापडले १५ बाधित

चांदगिरीत सापडले १५ बाधित

शिंदे प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र जाखोरी यांच्या मदतीने चांदगिरी गावात रॅपिड अँटिजेन टेस्ट शिबीर घेण्यात आले. लॅब टेक्निशियन सार्थक रोकडे, डॉ. रवींद्र कहांडळ, समन्वय अधिकारी विनय निकम, आरोग्यसेविका राणी शेलार, अंगणवाडी सेविका मोहिणी कटाळे यांच्या पथकाने ५० जणांची तपासणी केली. यावेळी १५ जणांंना कोरोनाची प्राथमिक लक्षणे आढळून आली. या बाधितांना बिटको रुग्णालयात जाऊन तेथील डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार घेण्याचे सांगितले. चांदगिरी गावचे सरपंच महेंद्र हांडगे, उपसरपंच रामहरी कटाळे, सदस्य अनिता बागूल, प्रियांका कटाळे, विद्या शेलार, शांताराम कटाळे, मनीषा कटाळे, माजी सरपंच रमेश आप्पा कटाळे, सामाजिक कार्यकर्ते कृष्णा बागूल, ग्रामसेविका पी. टी. सानप, शिक्षक दत्तू कारवाळ, उत्तम पवार आदी उपस्थित होते.

(फोटो २९ चांदगिरी) चांदगिरी येथे रॅपिड अँटिजेन टेस्ट शिबिरात तपासणी करताना जाखोरी आरोग्य उपकेंद्राचे डॉ. रवींद्र कहांडळ, विनय निकम, सार्थक रोकडे, रमेश आप्पा कटाळे, दत्तू कारवाळ, राणी शेलार आदी.

फोटो नं.WA145.jpg

Web Title: 15 affected in Chandgiri