‘मुक्त’चा १४ ला युवक महोत्सव
By Admin | Updated: January 12, 2016 23:23 IST2016-01-12T23:21:35+5:302016-01-12T23:23:03+5:30
‘मुक्त’चा १४ ला युवक महोत्सव

‘मुक्त’चा १४ ला युवक महोत्सव
नाशिक : शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा या हेतूने यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा केंद्रीय युवक महोत्सव गुरुवार, दि. १४ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता विद्यापीठ मुख्यालयात होणार आहे. महोत्सवाचे उद्घाटन अभिनेते अभिजित खांडकेकर यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. माणिकराव साळुंखे असतील. मुक्त विद्यापीठाच्या आठ विभागीय केंद्रांतर्गत हा महोत्सव आयोजित केला आहे. विविध १८ कला प्रकारांत महाराष्ट्रातील ११४ विद्यार्थी सहभागी होऊन आपले कलाविष्कार सादर करणार आहेत. (प्रतिनिधी)