येवला तालुक्यात १४६ अर्ज वैध

By Admin | Updated: February 7, 2017 23:48 IST2017-02-07T23:47:57+5:302017-02-07T23:48:19+5:30

माघारीनंतरच चित्र होणार स्पष्ट : तहसील कार्यालयात समर्थकांची गर्दी

146 application valid in Yeola taluka | येवला तालुक्यात १४६ अर्ज वैध

येवला तालुक्यात १४६ अर्ज वैध

येवला : पंचायत समिती व जिल्हा परिषद पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्यपदाच्या निवडणुकीसाठी मंगळवारी उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात आली.  येवला तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत विविध गटांसाठी ७०, तर गणांसाठी १०७ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. विविध उमेदवारांनी पक्षांच्या वतीने ३१ उमेदवारांनी भरलेल्या उमेदवारी अर्जासोबत अधिकृत पक्षाचा एबी फॉर्म जोडला नव्हता. असे असले तरी बाद ठरवण्यात आलेल्या या उमेदवारांनी अपक्ष उमेदवारी अर्जही दाखल केलेला होता तो वैध ठरला. परंतु सायगाव गणातून भाजपाच्या वतीने मनीषा पुणे यांनी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जासोबत एबी फॉर्म जोडलेला नव्हता. शिवाय त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्जही दाखल केलेला नव्हता. त्यामुळे भाजपाच्या वतीने भरलेला हा उमेदवारी अर्ज अपक्ष म्हणून वैध ठरला. सावरगाव गणातून अर्चना वैद्य यांनी राष्ट्रवादीच्या वतीने दाखल केलेल्या उमेदवारी अर्जावर पक्षाचे चिन्ह लिहिलेले नसल्याने त्यांची अपक्ष म्हणून उमेदवारी ग्राह्य धरण्यात  आली. निवडणूक आयोगाच्या नव्या नियमाचा फायदा या उमेदवारांना मिळाला. त्यामुळे छाननी ही केवळ औपचारिकता ठरली. निवडणूक निर्णय अधिकारी मधुमती सरदेसाई-राठोड, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी नरेशकुमार बहिरम यांनी  मंगळवारी सकाळी ११ वाजता छाननीला सुरु वात केली. सुमारे अडीच तासात उमेदवारी अर्जांची छाननी आटोपली. पाटोदा गटातून ११, राजापूर गटातून १६, अंदरसूल गटातून १७, मुखेड गटातून ७, नगरसूल गटातून ५ असे गटातून एकूण ५६ अर्ज वैध ठरवण्यात आले. पंचायत समितीसाठी धुळगाव गणातून ९, सायगाव गणातून ११, चिचोंडी खुर्द गणातून १६, पाटोदा गणातून ९, नगरसूल गणातून ९,  राजापूर गणातून ९, मुखेड गणातून
८, नागडे गणातून ८, सावरगाव  गणातून ५, अंदरसूल गणातून ६ असे एकूण ९० उमेदवारी अर्ज छाननीत वैध ठरले.
अंदरसूल गण- नम्रता जगताप (शिवसेना), सखाहरी लासुरे (भाजपा), शिवाजी धनगे (कॉँग्रेस), स्वाती सोनवणे (राष्ट्रवादी).
नागडे गण- प्रवीण गायकवाड (शिवसेना), दादाभाऊ मोरे  (भाजपा), मीरा माळी (कॉँग्रेस), भारती सोनवणे (राष्ट्रवादी), सयाजी माळी, संतोष निकम, माधव मोरे (सर्व अपक्ष). मुखेड गण- पुष्पा नागरे (शिवसेना), सोनाली शिंदे (भाजपा), छाया दिवटे (कॉँग्रेस), अनिता काळे (राष्ट्रवादी), वैशाली वेळंजकर व अस्मिता साताळकर (अपक्ष).
चिचोंडी खुर्द गण- शिवांगी पवार (राष्ट्रवादी), कविता आठशेरे (शिवसेना), शोभा मढवई (भाजपा), लक्ष्मी गोसावी (कॉँग्रेस), अर्चना सोनवणे (बसपा), भीमाबाई मढवई, सुनंदा काळे, वैशाली ठोंबरे, संगीता दिवटे, सरला जगताप, ज्योती गायकवाड, वर्षा रंधे, मनीषा मढवई (सर्व अपक्ष). (वार्ताहर)
जिल्हा परिषद गट, गणांतील पक्षनिहाय उमेदवार४
पाटोदा गट- भास्कर कोंढरे (शिवसेना), सूर्यभान गंगाधर नाईकवाडे (भाजपा), उस्मान शेख (भारतीय राष्ट्रीय कॉँग्रेस), संजय अंबादास बनकर (राष्ट्रवादी), विश्वास बुल्हे, विठ्ठल शेलार, रतन बोरणारे, निवृत्ती महाले
(सर्व अपक्ष).
नगरसूल गट- सविता पवार ङ्क्त (शिवसेना), उज्ज्वला पैठणकर (राष्ट्रवादी), कालिंदी पाटील (अपक्ष).
राजापूर गट- सुरेखा दराडे (शिवसेना), आरती ढाकणे (भाजपा), शकुंतला सोनवणे (राष्ट्रवादी), भारती पुणे (भारतीय राष्ट्रीय कॉँग्रेस), छाया खोकले, देविता आवारे, रेन्ना तांबोळी, कल्पना कुऱ्हे, चंद्रकला सोनवणे, सरला सानप (सर्व अपक्ष).
अंदरसूल गट- मकरंद सोनवणे (शिवसेना), बाबासाहेब डमाळे (भाजपा), रावसाहेब लासुरे (कॉँग्रेस), महेंद्रकुमार काले (राष्ट्रवादी), शाहू शिंदे, अश्विनकुमार जाधव,
बाळू साताळकर, रमेशसिंग परदेशी, बद्रिनाथ कोल्हे, श्रीरंग गायके, नवनाथ खोकले, संजय पवार, सूर्यभान जगताप, झुंजार देशमुख (सर्व अपक्ष).
मुखेड गट- कमल अहेर (शिवसेना), सुरेखा कदम (भाजपा), संगीता अहेर (कॉँग्रेस), कृष्णराव गुंड (राष्ट्रवादी), ज्योती पानसरे व अस्मिता साताळकर (अपक्ष).
पाटोदा गण- जयश्री बोरणारे (शिवसेना), अलका कुऱ्हाडे ङ्क्त (भाजपा), आशालता पाटील (कॉँग्रेस), सुनीता मेंगाणे ङ्क्त (राष्ट्रवादी), अर्चना गिते, रोहिणी बुल्हे, सुलभा वरे (सर्व अपक्ष).
धुळगाव गण- नवनाथ खोडके (शिवसेना), रवींद्र शेळके (भाजपा), सूर्यकांत गोसावी (कॉँग्रेस), मोहन खंडू शेलार (राष्ट्रवादी), विक्र ांत गायकवाड (बसपा), बाळकृष्ण कोटकर व बाबासाहेब पवार (अपक्ष).
नगरसूल गण- मंगेश भगत ङ्क्त (शिवसेना), विनोद पाटील (भाजपा), सुभाष निकम (राष्ट्रवादी), धर्मा पगारे बसपा), सतीश पैठणकर, नानासाहेब भड, नवनाथ बागल (सर्व अपक्ष).
सावरगाव गण- आशाबाई साळवे (शिवसेना), अर्चना वैद्य, शोभा जाधव, परिघा सालमुठे (सर्व अपक्ष).
राजापूर गण- लक्ष्मीबाई गरुड ङ्क्त (शिवसेना), निर्मला संसारे (भाजपा), आशाताई झाल्टे (कॉँग्रेस), सुमन म्हस्के (राष्ट्रवादी), कांताबाई पगारे (बसपा), राजश्री निकम, लीलाबाई गरुड उषाबाई जाधव (सर्व अपक्ष).
सायगाव गण- रूपचंद भागवत (शिवसेना), गोरख खैरनार (भाजपा), रंजना भागवत (कॉँग्रेस), राहुल भालेराव (राष्ट्रवादी), तान्हुबाई गायकवाड (बसपा), मनीषा पुणे, गणपत खैरनार, समाधान सोमासे  (सर्व अपक्ष).

Web Title: 146 application valid in Yeola taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.