पंचवटीत १४४ मंडळांनी केले अर्ज दाखल

By Admin | Updated: September 6, 2016 00:52 IST2016-09-06T00:52:16+5:302016-09-06T00:52:31+5:30

गणेशोत्सव : पाच मौल्यवान मंडळांचा समावेश

144 nominations filed by the Mandal in Panchavati | पंचवटीत १४४ मंडळांनी केले अर्ज दाखल

पंचवटीत १४४ मंडळांनी केले अर्ज दाखल

पंचवटी : पंचवटी पोलीस ठाण्यासह म्हसरूळ व आडगाव पोलीस ठाण्याची हद्द धरून पंचवटीत एकूण १४४ छोट्या-मोठ्या सार्वजनिक गणेशोत्सव मित्रमंडळांनी गणेशोत्सव साजरा करण्यासाठी संबंधित पोलीस ठाण्यात अर्ज सादर केले आहेत. १४४ मंडळांपैकी पाच मंडळे मौल्यवान आहेत. पंचवटीत यंदाही दरवर्षीप्रमाणे गणेशोत्सव मित्रमंडळांनी गणेशोत्सव प्रतिष्ठापनेची परंपरा कायम ठेवली आहे. पंचवटीतील छोट्या-मोठ्या सार्वजनिक मित्रमंडळांनी धार्मिक, सामाजिक देखाव्यांवर भर दिला आहे.
पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ५४, म्हसरूळला ५०, तर आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ४० अशा एकूण १४४ मित्रमंडळांनी गणेशोत्सव साजरा करण्यासाठी पोलीस ठाण्यात परवानगी अर्ज सादर केले होते.
पंचवटी पोलीस ठाण्याचे काही दिवसांपूर्वी विभाजन करून म्हसरूळ पोलीस ठाणे करण्यात आल्याने पंचवटीचा बराचसा भाग म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीला जोडला गेला आहे, त्यामुळे पंचवटीतील गतवर्षीच्या मंडळांपैकी निम्म्याने मंडळांची संख्या वर्ग झाली आहे. (वार्ताहर)

Web Title: 144 nominations filed by the Mandal in Panchavati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.