सटाणा : येथील नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत पहिल्यांदाच तब्बल १४४ प्रस्तावांना मंजुरी देण्याचा विक्रम रचला गेला. यामुळे शहराच्या विकासाला अधिक चालना मिळणार असल्याचा दावा नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी केला आहे.येथील नगरपालिकेच्या सभागृहात सोमवारी (दि.३) नगराध्यक्ष मोरे यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेत १४५ विषय ठेवण्यात आले होते. त्यापैकी १४४ विषय एकमताने मंजूर करण्यात आले. पुढील काही दिवसात लोकसभा व विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. आचारसंहिता काळात कामे मंजुरीसाठी तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे आतापासूनच योग्य नियोजन करणे सुरू केले आहे. शहरातील विविध कामे प्रस्तावित करण्यासाठी सर्वसाधारण सभेच्या ठरावाची आवश्यकता असते. त्यानुसार आज शहरातील सर्वच प्रभाग क्र मांक १ ते १० मधील विविध विकास कामांचे १४४ विषयांना सभेत मान्यता देण्यात आली. सभेला उपनगराध्यक्ष बाळासाहेब बागुल,गटनेते राकेश खैरनार, महेश देवरे, नितीन सोनवणे, दिनकर सोनवणे,सभापती सुनीता मोरकर, राहुल पाटील, दीपक पाकळे,शमा मन्सूरी,निर्मला भदाणे,शमीम मुल्ला,नगरसेवक, संगीता देवरे, पुष्पा सूर्यवंशी, रु पाली सोनवणे, सोनाली बैताडे, भारती सूर्यवंशी, सुवर्णा नंदाळे, आरिफ शेख, सुरेखा बच्छाव,आशा भामरे, सुलोचना चव्हाण, डॉ.विद्या सोनवणे, मनोहर देवरे मुख्याधिकारी हेमलता डगळे,आदींसह सर्व विभाग प्रमुख, उपस्थित होते.
सटाणा पालिकेत तब्बल १४४ प्रस्तावांना मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2018 17:30 IST
सर्वसाधारण सभा : विकास कामांना मिळणार चालना?
सटाणा पालिकेत तब्बल १४४ प्रस्तावांना मंजुरी
ठळक मुद्देपुढील काही दिवसात लोकसभा व विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. आचारसंहिता काळात कामे मंजुरीसाठी तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे आतापासूनच योग्य नियोजन करणे सुरू केले आहे.