१४ महिन्यांच्या बालिकेचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 01:53 AM2019-07-17T01:53:47+5:302019-07-17T01:56:10+5:30

अवघ्या चौदा महिन्यांच्या चिमुकलीच्या गळ्यावर तीक्ष्ण हत्याराने वार करून खून करण्यात आल्याची घटना आडगाव पोलीस ठाणे हद्दीतील साई पॅराडाइज अपार्टमेंटमध्ये मंगळवारी (दि.१६) घडली. दरम्यान, चिमुकलीच्या आईच्या शरीरावरही काही ठिकाणी जखमा आढळून आल्याचे पोलिसांनी सांगितले.

14-month-old daughter's blood | १४ महिन्यांच्या बालिकेचा खून

१४ महिन्यांच्या बालिकेचा खून

Next
ठळक मुद्देपोलिसांपुढे उलगडा करण्याचे आव्हानआईच्या शरीरावरही जखमा; खुनाचे गूढ कायम

नाशिक : अवघ्या चौदा महिन्यांच्या चिमुकलीच्या गळ्यावर तीक्ष्ण हत्याराने वार करून खून करण्यात आल्याची घटना आडगाव पोलीस ठाणे हद्दीतील साई पॅराडाइज अपार्टमेंटमध्ये मंगळवारी (दि.१६) घडली. दरम्यान, चिमुकलीच्या आईच्या शरीरावरही काही ठिकाणी जखमा आढळून आल्याचे पोलिसांनी सांगितले. बालिकेच्या खूनप्रकरणाचा उलगडा करताना पोलीसही संशयाच्या भोवऱ्यात अडकले असून, या घटनेप्रकरणी बालिकेच्या वडिलांनी आडगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या घटनेने शहरात हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शहरातील औरंगाबाद महामार्गावरील साई पॅराडाइज नावाच्या अपार्टमेंटमधील मुकेश पवार हे कुटुंबीयांसमवेत वास्तव्यास आहे. ते मंगळवारी नेहमीप्रमाणे नोकरीवर गेले असता घरात त्यांची पत्नी योगीता, त्यांचा शाळकरी मुलगा, दीड वर्षांची स्वरा होते. दुपारी २ वाजेच्या सुमारास बालिकेची आई योगीता पवार यांनी जखमी अवस्थेत घरातून बाहेर पडून शेजाऱ्यांना माहिती दिली तसेच भ्रमणध्वनीवरून काही नातेवाइकांनाही कळविले. यावेळी शेजाºयांनी धाव घेतली असता स्वरा जखमी अवस्थेत पलंगावर आढळून आली. यावेळी नातेवाईक व शेजाºयांनी तत्काळ मायलेकीला उपचारार्थ निमाणी येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले; मात्र यावेळी डॉक्टरांनी तपासून स्वराला मयत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच स्वराचे वडील मुकेश हेदेखील शहरात पोहचले. दरम्यान, मुलीच्या आईने रात्री उशिरापर्यंत पोलिसांना कुठलीही योग्य माहिती दिलेली नव्हती. त्यांच्यावरही खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बालिकेच्या गळ्यावर, हातावर धारदार शस्त्राच्या जखमा आढळून आल्याचे पोलिसांनी सांगितले. या खुनाचा उलगडा रात्री उशिरापर्यंत झालेला नव्हता; मात्र मुकेश यांच्या फिर्यादीवरून अज्ञात संशयिताविरुद्ध आडगाव पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रथमदर्शनी ही घटना संशयास्पद असून, घटनास्थळी पोलिसांसह श्वानपथक, वैज्ञानिक न्याय सहायक पथकाने भेट देऊन परिस्थितीजन्य पुरावे गोळा केले आहे.
चोरटा चाकू घेऊन घरात शिरला?
मुलीची आई योगीता यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार एक अज्ञात इसम तोंडाला रुमाल बांधून घरात चाकू घेऊन चोरीच्या इराद्याने घुसला व त्याने माझ्यासह मुलीवर हल्ला चढविला. झटापट करत असताना मी जखमी झाले व त्याने मुलीवरही वार करून पळ काढल्याची माहिती प्रथमदर्शनी समोर आली आहे.

Web Title: 14-month-old daughter's blood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.